खदान व्यावसायिकाची गाेळ्या झाडून हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 11:02 AM2020-12-27T11:02:22+5:302020-12-27T11:07:33+5:30

Murder in Akola : गाेपाल अग्रवाल यांची शनिवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास चार गाेळ्या झाडून हत्या केली.

Stone Crusher businessman murderd in Akola | खदान व्यावसायिकाची गाेळ्या झाडून हत्या

खदान व्यावसायिकाची गाेळ्या झाडून हत्या

googlenewsNext
ठळक मुद्देत्यांच्यावर पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दाेघांनी हल्ला चढविला.छातीत एक गाेळी तर दुसरी त्यांच्या ताेंडात झाडली. दगडाने हल्ला करीत त्यांना जागेवरच मारण्याचा प्रयत्न मारेकऱ्यांनी केला.

अकाेला : खाेलेश्वर येथील रहिवासी तथा खदान व्यावसायिक गाेपाल अग्रवाल यांची शनिवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास चार गाेळ्या झाडून हत्या केल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावरील अप्पू पाॅइंटजवळ घडली. अग्रवाल बाेरगाव मंजू येथून परत येत असताना मारेकऱ्यांनी त्यांना अडवत त्यांच्या ताेंडात गाेळी झाडली तसेच डाेक्यावरही दगडाने वार केल्याची माहिती पाेलीस सूत्रांनी दिली. पाेलिसांनी घटनास्थळावरून दाेन जिवंत काडतुसे जप्त केली असून, आराेपींच्या शाेधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. अग्रवाल यांच्या हत्येला नेमकी कशाची किनार आहे, हे रात्री उशिरापर्यंत स्पष्ट झाले नाही.

गाेपाल हनुमंतप्रसाद अग्रवाल ४५ यांच्या बंधूची बाेरगाव मंजू येथे गिट्टी खदान आहे. शनिवारी दिवसभराचे कामकाज आटाेपल्यानंतर सुमारे २ लाख रुपयांची राेकड घेऊन गाेपाल अग्रवाल हे अकाेल्याकडे येत असताना त्यांच्यावर पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दाेघांनी हल्ला चढविला. अप्पू पाॅइंटजवळ त्यांना अडवल्यानंतर मारेकऱ्यांनी त्यांच्यावर गाेळी झाडताच अग्रवाल यांनी दुचाकी साेडून पळ काढला; मात्र मारेकऱ्यांनी त्यांचा पाठलाग करीत निर्माणाधीन असलेल्या महामार्गाच्या एका खड्ड्यात त्यांच्यावर पुन्हा गाेळी झाडली. दाेन गाेळ्या झाडल्यानंतर अग्रवाल यांच्या छातीत एक गाेळी तर दुसरी त्यांच्या ताेंडात झाडली. त्यानंतरही डाेक्यावर दगडाने हल्ला करीत त्यांना जागेवरच मारण्याचा प्रयत्न मारेकऱ्यांनी केला; मात्र त्यानंतरही जिवंत असलेल्या अग्रवाल यांना काहींनी तातडीने सर्वाेपचार रुग्णालयात आणण्यासाठी गाडीत टाकले; मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. डाॅक्टरांनीही त्यांना मृत घाेषित केले. या घटनेची माहिती मिळताच पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त पाेलीस अधीक्षक माेनिका राऊत, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शैलेश सपकाळ, खदानचे ठाणेदार डी. सी. खंडेराव, वाहतूक शाखेचे प्रमुख गजानन शेळके, एमआयडीसीचे ठाणेदार गवई यांनी ताफ्यासह धाव घेतली. त्यानंतर फाॅरेन्सिक व इन्व्हेस्टिगेशन व्हॅनव्दारे घटनास्थळ पंचनामा करण्यात आला. घटनास्थळावरील रक्ताचे नमुने, दाेन जिवंत काडतुसे व एक गिफ्ट तसेच चप्पल जप्त करण्यात आली आहे.

Web Title: Stone Crusher businessman murderd in Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.