श्रीराम फायनान्स कंपनीवर फसवणुकीचा गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 05:59 AM2019-03-22T05:59:35+5:302019-03-22T05:59:45+5:30

कर्जासाठी दिलेल्या कागदपत्रांचा गैरवापर करण्याबरोबरच कर्जाची रक्कम कर्जदाराच्या संमतीशिवाय दुसऱ्या खात्यावर वर्ग करून श्रीराम सिटी फायनान्स कंपनीने फसवणूक केल्याची तक्रार पुण्याच्या व्यापाऱ्याने केली आहे.

Shriram Finance Company fraud cheating | श्रीराम फायनान्स कंपनीवर फसवणुकीचा गुन्हा

श्रीराम फायनान्स कंपनीवर फसवणुकीचा गुन्हा

googlenewsNext

क-हाड (जि. सातारा)  - कर्जासाठी दिलेल्या कागदपत्रांचा गैरवापर करण्याबरोबरच कर्जाची रक्कम कर्जदाराच्या संमतीशिवाय दुसऱ्या खात्यावर वर्ग करून श्रीराम सिटी फायनान्स कंपनीने फसवणूक केल्याची तक्रार पुण्याच्या व्यापाऱ्याने केली आहे. त्यानुसार कºहाड शहर पोलिसांत श्रीराम फायनान्सच्या १९ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

श्रीराम सिटी युनियन फायनान्स, सुब्रमण्यम कृष्णमूर्ती, व्यंकटरमन मुरली, रणवीर देवल, चित्ता दासरंजन, विपेन कपूर, ध्रुवासन रामचंद्र, प्रणव प्रकाश पटनायक, देवेंद्रनाथ सारंगी, शशांक सिंग, माया स्वामीनाथन सिन्हा, गेरिट वॅन हिदे लोदवयक, राम सुब्रमण्य चंद्रशेखर (सर्व रा. अंगाप्पा अंगाप्पा निकेन रोड, मद्रास, ग्रेटर चेन्नई, तामिळनाडू), दिगंबर नारायण कुलकर्णी, श्रीराज माने, अनिकेत अरुण साबेरकर, नीलेश विठ्ठल कांबळे, संदीप शिवाजी चव्हाण, जे. डी. इंगवले (सर्व रा. शनिवार पेठ, अनू एजन्सीजवळ, कºहाड) अशी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

याबाबत संग्रामसिंह माधवराव घाटगे (रा. आंबेगाव बुद्रुक, पुणे) यांनी कºहाड शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, पुणे येथील व्यापारी संग्रामसिंह घाटगे यांना संशयितांनी श्रीराम फायनान्सचे ६५ लाख रुपये व्यावसायिक कर्ज घेण्यास भाग पाडले. तसेच कर्ज घेतेवेळी घेतलेल्या कागदपत्राचा त्यांनी गैरवापर केला. तसेच ३३ लाख ५१ हजार एवढी रक्कम घाटगे यांच्या खात्यावर जमा न करता ती दुसºयाच संस्थेच्या खात्यावर वर्ग करण्यात आली. कर्ज घेताना संशयितांनी घाटगे यांना ९.५० टक्के व्याजदर सांगितला होता. मात्र, प्रत्यक्षात १३.७० टक्के दराने व्याज आकारणी करून घाटगे यांनी दिलेल्या कर्ज मंजुरीच्या कागदपत्रातही संशयितांनी फेरफार केल्याचा आरोप आहे.

Web Title: Shriram Finance Company fraud cheating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.