डोळ्यात मिरची पूड टाकून ५ लाख रुपये लुटण्याचा दुकानदारानेच रचला बनाव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2019 12:56 PM2019-07-08T12:56:32+5:302019-07-08T12:57:00+5:30

खेड शिवापूर येथील व्यापाऱ्याचे पैसे देण्यासाठी आलेल्या दुकानदाराच्या कामगाराला तिघा जणांनी अडवून त्यांच्या डोळ्यात मिरची पुड टाकून त्याच्याकडील ५ लाख रुपये लुबाडून नेल्याची घटना रविवारी घडली़ होती . 

The shopkeeper is planning of 5 lakh rupees theft plan by throwing chilli powder in the eye | डोळ्यात मिरची पूड टाकून ५ लाख रुपये लुटण्याचा दुकानदारानेच रचला बनाव

डोळ्यात मिरची पूड टाकून ५ लाख रुपये लुटण्याचा दुकानदारानेच रचला बनाव

googlenewsNext

 पुणे : शेजारच्या दुकानदाराने पुण्यातील व्यापाºयांना देण्यासाठी दिलेल्या साडेसात लाख रुपयांचा मोह न आवल्याने दुकानदाराने आपल्या दोन साथीदारांसह आपल्याला लुटल्याचा बनाव रचला़. भारती विद्यापीठ पोलिसांनी हा बनाव उघडकीस आणला असून दुकानदार व त्याच्या दोन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे़. त्यांच्या करुन ५ लाख रुपयेही हस्तगत करण्यात आले आहेत़. 
 खेड शिवापूर येथील व्यापाऱ्याचे पैसे देण्यासाठी आलेल्या दुकानदाराच्या कामगाराला तिघा जणांनी अडवून त्यांच्या डोळ्यात मिरची पुड टाकून त्याच्याकडील ५ लाख रुपये लुबाडून नेले़. ही घटना कात्रज येथील उड्डाण पुलाखालील सेवा रस्त्यावर रविवारी रात्री ८ वाजता घडली़. 
याबाबत पोलिसांनी सांगितले की, खेड शिवापूर येथे कल्याणसिंह राजपुरोहित याचे मिठाईचे दुकान आहे. कल्याणसिंह कामानिमित्ताने पुण्याला निघाला होता. त्याच्या शेजारी असलेल्या किरणा माल दुकानदार रमेश चौधरी यांनी कल्याणसिंह ला दोन व्यापाºयाला देण्यासाठी रक्कम दिली. कल्याणसिंह याने नवले ब्रीज येथे कोथरूडच्या व्यापाऱ्याचे अडीच लाख रुपये दिले. त्यानंतर कोंढव्याचे व्यापारी प्रकाश पाटील यांना ५ लाख रुपये देण्यासाठी जात असताना कात्रज चौकातील उड्डाणपूलाखालील सेवा रस्त्यावर ते आले असताना समोरुन दोन दुचाकीवरुन तिघे जण आले़. त्यांनी कल्याणसिंह यांच्या डोळ्यात मिरची पुड टाकून त्याच्यांकडील ५ लाख रुपये लुटून ते चोरटे कात्रज कोंढवा रोडला पळून गेले़. कल्याणसिंह यांनी याची माहिती तातडीने पोलीस नियंत्रण कक्षाला दिली़. कल्याणसिंह याच्या बोलण्यात काही विसंगती दिसत होती. तसेच त्याच्या डोळ्यात मिरची पुड टाकल्याचे तो सांगत असला तरी त्याचे डोळे लाल झालेले दिसत नव्हते़. त्यामुळे पोलिसांना संशय आल्याने भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू पवार व गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांनी त्याची कसून चौकशी केल्यावर त्याने हा बनाव रचल्याची कबुली दिली.

Web Title: The shopkeeper is planning of 5 lakh rupees theft plan by throwing chilli powder in the eye

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.