शिवाजी पार्क परिसरात भररस्त्यात तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; गस्तीवरील पोलीस आले हाकेला धावून

By पूनम अपराज | Published: December 28, 2018 11:40 PM2018-12-28T23:40:34+5:302018-12-28T23:41:32+5:30

मुंबई - दादरसारखं गजबजलेलं ठिकाण देखील महिलांसाठी असुरक्षित झाल्यासारखी घटना शिवाजी पार्कनजीक घडली आहे. घाटकोपर परिसरात राहणाऱ्या 18 वर्षीय ...

Shivaji Park catapulted the girl in a huge crowd; A police in the air came and ran | शिवाजी पार्क परिसरात भररस्त्यात तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; गस्तीवरील पोलीस आले हाकेला धावून

शिवाजी पार्क परिसरात भररस्त्यात तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; गस्तीवरील पोलीस आले हाकेला धावून

googlenewsNext

मुंबई - दादरसारखं गजबजलेलं ठिकाण देखील महिलांसाठी असुरक्षित झाल्यासारखी घटना शिवाजी पार्कनजीक घडली आहे. घाटकोपर परिसरात राहणाऱ्या 18 वर्षीय तरुणीवर अतिप्रसंग होता होता टळला आहे. घरातल्यांसोबत भांडण करून शिवाजी पार्क येथे आलेल्या तरुणीवर भरस्त्यात अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाला. त्या नराधमाच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेत मुलीने कसे बसे स्वत:ची सुटका करून घेतली. या प्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांनी एका ईस्त्रीवाल्याला अटक केली आहे.

घाटकोपर येथे आपल्या कुटुंबियांसोबत राहणारी 18 वर्षीय तरुणी. घरची परिस्थिती ही बेताची असल्यामुळे काम करून ती शिक्षण घेते. 26 डिसेंबर रोजी तिचे भावासोबत भांडण झाल्यामुळे स्वत:चा फोन घरात आपटून रागात तिने घर सोडले. रात्री 11 वाजताच्या सुमारास तरूणी टॅक्सीने एकांत आणि  शांततेसाठी शिवाजी पार्क येथे आली. समुद्र किनारी असलेल्या दगडांवर ती रडत होती. रात्री 12 वाजल्यानंतर किनाऱ्यावरील गर्दी कमी झाली होती. रात्रीच्या सामसुम रस्त्यावर ती एकटीच असल्याचे तिच्या लक्षात आल्यानंतर ती भयभीत झाली. घरच्यांशी संपर्क करण्यासाठी तिच्याजवळ मोबाईल नव्हता. त्याच वेळी आरोपी ईस्त्रीवाला एका कोपऱ्यात भांडी घासत होता. त्यावेळी तरुणी त्याच्याजवळ मदतीच्या आशेने गेली. ईस्त्रीवाला उमेश उर्फ रमेश रामलखन कनोजियाने तिच्याजवळ विचारपूस केली. तरुणीने भावाशी संपर्क करण्यासाठी उमेशकडे फोन मागून भावाला आपण सुखरूप असल्याचे कळवत. घरी परतत असल्याचे कळवले. तरुणी रस्ता चुकली असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने तिचा फायदा घेण्यासाठी तिला गल्लीबोळातून रस्ता भरकटवून समुद्रकिनारी दगडाजवळ आणले. तरुणीला काही समजायच्या आतच त्याने तिच्यावर अतिप्रसंग करण्यास सुरूवात केली. रात्रीची वेळ असल्याने वर्दळ नव्हती. दहा ते पंधरा मिनिटांच्या झटापटीनंतर तरुणीने कशीबशी स्वत:ची सुटका करून घेत तेथून पळ काढला. त्यावेळी उमेशने तिचा पाठलाग करण्यास सुरूवात केली. मोकळ्या आणि सुनसान  रस्त्यावर  काही अंतरावर तरुणीला गस्तीवर असलेली पोलिसांची गाडी दिसली. त्यावेळी पोलिसांची मदत घेत तिने तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी ही तातडीने उमेशचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलिसांनी उमेशवर 354, 354(अ), भा.दं.वि. कलमानुसार गुन्हा नोंदवत त्याला अटक केली आहे. वेळीच पोलिस देवदूत म्हणून आल्याने वाचले. अन्यथा मुंबईत रात्रीच्या वेळी महिलांवर वाईट नजर ठेवून असणाऱ्या लांडग्याच्या हातून मी उद्धवस्त झाली असते असे पीडितेने सांगितले.

Web Title: Shivaji Park catapulted the girl in a huge crowd; A police in the air came and ran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.