Sensing the body of a unidentified person, Kandivali found his body | कांदिवलीत अनोळखी इसमाचा मृतदेह सापडल्याने खळबळ
कांदिवलीत अनोळखी इसमाचा मृतदेह सापडल्याने खळबळ

 

मुंबई - कांदिवली परिसरात आज एका अनोळखी इसमाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. याप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून त्याची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. 

एकतानगर याठिकाणी असलेल्या इमारतीच्या बांधकाम साईटजवरील पाणी साचलेल्या खड्ड्यात एक मृतदेह तरंगत असल्याची माहिती कांदिवली पोलिसांना मिळली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णलयात पाठवला. मृत व्यक्ती ही वीस ते पंचवीस वयोगटातील असावी असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. दारूच्या नशेत तोल जाऊन खड्ड्यात पडली आणि वेळीच मदत न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. प्रथमदर्शी तरी यामध्ये काही संशयीत बाब आम्हाला आढळलेली नाही. मात्र त्याच्या शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आम्ही करत आहोत', असे कांदिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पोंडकुळे यांनी सांगितले. संबंधित व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून आम्ही या वयोगटातील व्यक्ती हरवल्याची तक्रार आसपासच्या पोलीस ठाण्यात आली आहे का, याबाबत चौकशी करत आहोत असेही त्यांनी सांगितले.


Web Title: Sensing the body of a unidentified person, Kandivali found his body
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.