खोटे सोने विक्री करणाऱ्या जोडप्याला ठोकल्या बेड्या, खोदकामात सोन्याचे दागिने मिळाले सांगून विकले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 12:11 AM2019-05-10T00:11:02+5:302019-05-10T00:11:32+5:30

मुंबई - अहमदाबाद महामार्गावरील पेल्हार फाटा येथे प्रभात पेट्रोल पंपाच्याजवळ खोदकाम करताना सोन्याचे दागिने मिळाले असल्याचे सांगून खोट्या दोन सोन्याच्या माळा विकणार्या जोडप्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या वसई युनिटने बेड्या ठोकल्या आहे.

Selling the couple who sell false gold and sold gold ornaments, and gold ornaments in the dug | खोटे सोने विक्री करणाऱ्या जोडप्याला ठोकल्या बेड्या, खोदकामात सोन्याचे दागिने मिळाले सांगून विकले

खोटे सोने विक्री करणाऱ्या जोडप्याला ठोकल्या बेड्या, खोदकामात सोन्याचे दागिने मिळाले सांगून विकले

googlenewsNext

नालासोपारा - मुंबई - अहमदाबाद महामार्गावरील पेल्हार फाटा येथे प्रभात पेट्रोल पंपाच्याजवळ खोदकाम करताना सोन्याचे दागिने मिळाले असल्याचे सांगून खोट्या दोन सोन्याच्या माळा विकणार्या जोडप्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या वसई युनिटने बेड्या ठोकल्या आहे. वालीव पोलीसांच्या ताब्यात पकडलेल्या जोडप्याला तपासासाठी देण्यात आले आहे. आता या जोडप्यांचे कोण कोण साथीदार आहेत. कुठे कुठे खोट्या सोन्याचे दागिने विकून त्यांनी लोकांची फसवणूक केली आहे याचा शोध घेत पोलीस करीत आहेत.

नालासोपारा पूर्वेकडील संतोषभवन परिसरातील लोटस अपार्टमेंटच्या रूम नंबर ४०७ मध्ये राहणाºया हेअर स्टाइलिस्ट रुबिना शकील शेख (३३) यांना रविवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास मुंबई अहमदाबाद महामार्गावरील पेल्हार फाटा येथील प्रभात पेट्रोल पंपाच्याजवळ ३० ते ३५वयोगटातील दोन अनोळखी पुरु ष आणि एका अनोळखी महिलेने खोदकाम करतांना सोन्याचे दागिने मिळाले असल्याचे सांगून ३ सोन्याचे खरे मणी दिले. हे मणी खरे आहे की खोटे बघण्यासाठी रुबिना सोनाराकडे गेल्या. मणी खरे असल्याने विश्वास संपादन करून तिन्ही अनोळखी आरोपींनी रुबिना यांना खोट्या सोन्याच्या दोन माळा देऊन ३० हजार रु पये घेतले. या दोन्ही माळा सोनाराने तपासल्यावर नकली असल्याचे सांगितल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तक्रार केली.

खोदकामात सोने भेटल्याचे सांगून नकली दागिने देऊन कोणाची फसवणूक झाली असेल त्यांनी पालघर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या वसई युनिटच्या शाखेशी संपर्क साधावा. - जितेंद्र वनकोटी,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक
 

Web Title: Selling the couple who sell false gold and sold gold ornaments, and gold ornaments in the dug

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.