नेहमीच्या गुंडगिरीला कंटाळून सराईत गुन्हेगाराची हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 04:45 PM2018-10-30T16:45:13+5:302018-10-30T17:14:51+5:30

सुरेश शांताराम साळवे (वय ४९) असं मृत गुंडाचं नाव आहे. त्याच्याविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात घरफोडी, चोऱ्या आदी दहा गंभीर गुन्हे दाखल आहेत. मृत साळवे हा रिक्षाचालक होता.

Sarat crime killer with the usual bullying | नेहमीच्या गुंडगिरीला कंटाळून सराईत गुन्हेगाराची हत्या 

नेहमीच्या गुंडगिरीला कंटाळून सराईत गुन्हेगाराची हत्या 

googlenewsNext

मुंबई - मुलुंड पश्चिमेकडील गौतम नगर परिसरात काल उशिरा रात्री १२.३५ वाजताच्या सुमारास सराईत गुंडाची लोखंडी पाईपने मारहाण करून हत्या केली. याबाबत मुलुंड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अभय प्रकाश सावंत (वय २५) याला काही तासातच अटक करण्यात आली. 

सुरेश शांताराम साळवे (वय ४९) असं मृत गुंडाचं नाव आहे. त्याच्याविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात घरफोडी, चोऱ्या आदी दहा गंभीर गुन्हे दाखल आहेत. मृत साळवे हा रिक्षाचालक होता. तो साळवे चाळीत राहत होता असून त्याची राहत्या परिसरात दहशत होती. नेहमीच्या गुंडगिरीला लोकं कंटाळली होती. अभय सावंतच्या भावाला काही महिन्यापूर्वी साळवेने मारहाण केली होती. तसेच अभयला देखील रस्त्यात येता - जाता साळवे अपशब्द बोलत होता. अखेर साळवेच्या नेहमीच्या त्रासाला कंटाळून काल उशिरा रात्री अभय तोंडाला रुमाल बांधून आला आणि स्टार मित्र मंडळाच्या कट्ट्यावर बसलेल्या साळवेवर लोखंडी पाईपने चोपले. या मारहाणीत साळवे गंभीर जखमी झाला. त्याच्या चेहऱ्यावर आणि जबड्यावर दुखापत झाली होती. याबाबत माहिती मिळताच साळवेच्या मुलाने जखमी अवस्थेत पडलेल्या वडिलांना रिक्षेतून अगरवाल रुग्णालयात नेले. मात्र, रुग्णालयात साळवेला डॉक्टरांनी मृत घोषित केले.त्यांनतर मुलुंड पोलिसांनी काही तासातच आरोपी अभयला बेड्या ठोकल्या आहेत. 

Web Title: Sarat crime killer with the usual bullying

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.