नीरवच्या रोल्स रॉयसची चक्क १.७० कोटींना विक्री

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2019 08:31 PM2019-06-05T20:31:02+5:302019-06-05T20:33:55+5:30

या गाड्यांची विक्री करण्याचं कंत्राट ई-कॉमर्स कंपनी एमएसटीसीला देण्यात आलं आहे.

Sales of Nirav's Rolls-Royce in auction at amount to 1.70 crore | नीरवच्या रोल्स रॉयसची चक्क १.७० कोटींना विक्री

नीरवच्या रोल्स रॉयसची चक्क १.७० कोटींना विक्री

googlenewsNext
ठळक मुद्देकारसाठी लागलेल्या नव्या बोलीच्या रकमेचा अभ्यास करून कारची विक्री करायची की, नाही याचा निर्णय ही कंपनी घेईल.स्कोडा सुपर्ब कारवर आधी ७.०२ लाख रुपयांची बोली लावण्यात आली होती.

मुंबई - अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी)  नीरव मोदीच्या १२ पैकी ६ गाड्यांचा मंगळवारी फेरलिलाव केला. या फेरलिलावात मोदीची रोल्स रॉयस घोस्ट ही कार १.७० कोटी रुपयांना तर पोर्शे ही कार ६० लाख रुपयांना विकण्यात आली.

या अगोदरच्या लिलावात रोल्स रॉयस घोस्टवर १.३३ कोटी रुपयांची तर पोर्शे वर ५४.६० लाख रुपयांची बोली लावण्यात आली होती. परंतु बोली लावणारे डिपाॅझिटची रक्कम भरण्यात असमर्थ ठरल्याने हा लिलाव रद्द करण्यात आला. याचसोबत आणखी ३ गाड्यांवरही बोली लावण्यात आली. यापैकी मर्सिडीज बेंज जीएल ३५० कारवर आधी ५३.७६ लाख रुपयांची बोली लावण्यात आली होती. या कारवर आता ४८ लाख रुपयांची बोली लावण्यात आली. होंडा ब्रिओवर अगोदर ३.९० लाख रुपयांची बोली लावण्यात आली होती. त्या कारवर आता २.३९ लाख रुपयांची बोली लावण्यात आली. तर टोयोटा इनोव्हा कारवर आधी ९.१२ लाख रुपयांची बोली लावण्यात आली होती. या कारवर आता ८.७० लाख रुपयांची बाेली लावण्यात आली. स्कोडा सुपर्ब कारवर आधी ७.०२ लाख रुपयांची बोली लावण्यात आली होती. मात्र, पुन्हा या कारवर बोली लावण्यात आलेली नाही. या गाड्यांची विक्री करण्याचं कंत्राट ई-कॉमर्स कंपनी एमएसटीसीला देण्यात आलं आहे. त्यानुसार कारसाठी लागलेल्या नव्या बोलीच्या रकमेचा अभ्यास करून कारची विक्री करायची की, नाही याचा निर्णय ही कंपनी घेईल.

Web Title: Sales of Nirav's Rolls-Royce in auction at amount to 1.70 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.