Robert Vadra's difficulties; Raid on ED's office | रॉबर्ट वड्रा यांच्या अडचणीत वाढ; ईडीची कार्यालयावर छापेमारी 
रॉबर्ट वड्रा यांच्या अडचणीत वाढ; ईडीची कार्यालयावर छापेमारी 

ठळक मुद्देरॉबर्ट वड्रा यांच्या नवी दिल्लीतील कार्यालयांवर छापा घातलावाड्रा यांच्या नवी दिल्लीतील ३ कार्यालयांवर ईडीने छापे टाकले आहेतआमच्या माणसांना ईडीने खोलीत बंदिस्त केले आहे.

नवी दिल्ली - अंबलबजावणी संचालनालयाने (ईडी) रॉबर्ट वड्रा यांच्या नवी दिल्लीतील कार्यालयांवर छापा घातला आहे. वाड्रा यांच्या नवी दिल्लीतील ३ कार्यालयांवर ईडीने छापे टाकले आहेत. ईडीमधील अनेक अधिकारी वड्रा यांच्या कार्यालयात तपास करत असल्याची माहिती उघड झाली आहे.  
आमच्या माणसांना ईडीने खोलीत बंदिस्त केले आहे. त्याचप्रमाणे त्यांना भेटण्याची कोणालाही मुभा नाही असे वाड्रा यांच्या वकिलांनी सांगितले. गेल्या साडेचार वर्षांपासून ते याप्रकरणी तपस यंत्रणा तपास करत आहेत. मात्र, त्यांना याप्रकरणात काहीच गैर किंवा ठोस पुरावे सापडले नाहीत. त्यामुळे ते आम्हाला डांबून ठेवून बोगस पुरावे तयार करत असल्याचा खळबळजनक आरोप वाड्रा यांच्या वकिलांनी केला आहे.
Web Title: Robert Vadra's difficulties; Raid on ED's office
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.