चाळीत दारु पिण्यास मज्जाव केल्याने महिलेसह तिच्या पती आणि मुलास मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 04:48 PM2019-03-22T16:48:36+5:302019-03-22T16:51:46+5:30

चाळीत दारू पिण्यास मज्जाव केल्याने महिलेस शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले.

refuse to drinking alcohol in socety , assaulting her husband and son with the woman | चाळीत दारु पिण्यास मज्जाव केल्याने महिलेसह तिच्या पती आणि मुलास मारहाण

चाळीत दारु पिण्यास मज्जाव केल्याने महिलेसह तिच्या पती आणि मुलास मारहाण

Next

पिंपरी : चाळीत दारू पिण्यास मज्जाव केल्याने महिलेस शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. पिंपरीगावातील बालामन चाळीत गुरुवारी (दि. २१) सायंकाळी हा प्रकार घडला. या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चारुदत्त हिरामन खुडे (वय २१), आशिष गुंजेकर (वय २२), रवी इंगळे (वय २३) आणि आशिष हिवाळे (वय २२) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ४६ वर्षीय महिलेने या प्रकरणी फिर्याद दिली आहे. 
पिंपरीगावातील बालमन चाळीत आरोपी दारु पित बसले होते. त्यावेळी फिर्यादी महिला त्यांना म्हणाल्या, येथे वस्तीतील लोक ये जात असतात. तुम्ही येथे बसून दारू पिऊ नका, येथून निघून जा. त्यानंतर आरोपी चारुदत्त हिरामन खुडे  महिलेस म्हणाला, ही काय तुमच्या बापाची जागा आहे का? असे म्हणून चारुदत्त याने फिर्यादी महिलेस शिवीगाळ करून त्यांच्या अंगावर धावून जात धक्काबुक्की करू लागला. त्यावेळी फिर्यादी महिला सोड सोड असे म्हणून ओरडली असताना त्यांचा आवाज ऐकून महिलेचा पती घरातून बाहेर आले आणि त्यांनी महिलेस सोडविण्याचा प्रयत्न केला. या वेळी आशिष गुंजेकर, रवी इंगळे आणि आशिष हिवाळे यांनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर फिर्यादी महिलेचा मुलगा गौरव पळत आला असता चारुदत्त याने तेथील बाटली गौरव याच्या पाठीवर मारली आणि आशिष गुजेकर याने तेथील दगड गौरव याच्या डोक्यात मारून जखमी केले. त्यानंतर फिर्यादी महिला ओरडत असताना चारुदत्त याने थांब तुला दाखवतोच, तुझा पोरगा कसा फिरतो ते पाहतोच अशी धमकी दिली. तसेच फिर्यादी महिलेचा ब्लाऊज खांद्यावर फाडून त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून सर्व आरोपी तेथून पळून गेले.

Web Title: refuse to drinking alcohol in socety , assaulting her husband and son with the woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.