अहमदनगरमध्ये बनावट डिग्री प्रमाणपत्रांचे रॉकेट, कॉम्प्युटर सेंटर चालक ताब्यात  

By अण्णा नवथर | Published: July 14, 2023 03:15 PM2023-07-14T15:15:48+5:302023-07-14T15:15:58+5:30

बनावट डिग्रीचे प्रमाणपत्र तयार करणारे मोठे रॅकेट असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Racket of fake degree certificates, computer center operator arrested in Ahmednagar | अहमदनगरमध्ये बनावट डिग्री प्रमाणपत्रांचे रॉकेट, कॉम्प्युटर सेंटर चालक ताब्यात  

अहमदनगरमध्ये बनावट डिग्री प्रमाणपत्रांचे रॉकेट, कॉम्प्युटर सेंटर चालक ताब्यात  

googlenewsNext

अहदनगर: येथील बालिकाश्रम रोड परिसरात असलेल्या कॉम्प्युटर सेंटर मधून अनेक बनावट डिग्रीचे प्रमाणपत्र अन्य जिल्ह्यात आणि परराज्यातही वितरित करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बनावट डिग्रीचे प्रमाणपत्र तयार करणारे मोठे रॅकेट असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
 
या प्रकरणी तोफखाना पोलिसांनी बालिकाश्रम रोडवरील कॉम्प्युटर सेंटर चालकास ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून आत्तापर्यंत 60 ते 70 डिग्री यांचे प्रमाणपत्र ताब्यात घेण्यात आले आहेत. त्याने आणखी काही बनावट प्रमाणपत्र अहमदनगर जिल्हा शेजारच्या छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे तसेच परराज्यातही वितरित केले असावेत, असा अंदाज पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी सांगितले.
 

Web Title: Racket of fake degree certificates, computer center operator arrested in Ahmednagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.