Police raid on the art center of Lodaga Shivar; Four held in possession | लोदगा शिवारातील कला केंद्रावर पोलिसांची धाड; चौघांना घेतले ताब्यात
लोदगा शिवारातील कला केंद्रावर पोलिसांची धाड; चौघांना घेतले ताब्यात

लातूर - शहरापासून जवळच असलेल्या लातूर-निटूर मार्गावरील लोदगा शिवारातील एका कला केंद्रावर पोलीस पथकाने बुधवारी पहाटे छापा मारला. यावेळी रोख रकमेसह चौघांना ताब्यात घेतले असून, औसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लातूर-निटूर या मार्गावरील लोदगा शिवारात असलेल्या एका कलाकेंद्रावर अनैतिक प्रकार सुुरु असल्याची माहिती खबऱ्यामार्फत लातूर ग्रामीणच्या उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील यांना मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांच्या पथकाने बुधवारी पहाटे ५ वाजता छापा मारला. यावेळी कला केंद्रावरील तीन मुलींसह चौघा पुरुषांना ताब्यात घेतले आहे. यावेळी रोख २० हजार ६९३ रुपये, दारुच्या बाटल्या असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत किरण शरद जाधव, अमोल स्वरुप उजंबे (दोघेही रा. लोदगा ता. औसा), दगडू ज्ञानोबा खैरमोडे (रा.  साळे गल्ली लातूर), बालाजी सूर्यकांत जाधव (रा. पानचिंचोली ता. निलंगा) यांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याविरोधात औसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लातूर ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील यांच्या पथकाने केली.


Web Title: Police raid on the art center of Lodaga Shivar; Four held in possession
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.