वृद्धांना लुटणारा तोतया पोलीस गजाआड 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2018 09:30 PM2018-08-09T21:30:22+5:302018-08-09T21:31:45+5:30

आरोपीविरोधात विविध पोलीस ठाण्यात १० हून अधिक गुन्हे दाखल

police arrested fake cop | वृद्धांना लुटणारा तोतया पोलीस गजाआड 

वृद्धांना लुटणारा तोतया पोलीस गजाआड 

Next

मुंबई - पोलिस असल्याची बतावणी करून वृद्ध महिलांना शहरात विविध ठिकाणी लुबाडणाऱ्या टोळीतील एका सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात गुन्हे शाखेचा कक्ष -1 च्या पोलिसांना यश आले आहे. राजेश सापजी बापर्डेकर (वय - 41) असे या आरोपीचे नाव आहे. राजेशवर मुंबईच्या विविध पोलिस ठाण्यास 10 हून अधिक गुन्ह्यांची नोंद असून जामीनावर सुटल्यानंतर  पुन्हा हा आरोपी चोऱ्या करत असल्याचे पोलिस उपायुक्त दिलीप सावंत यांनी सांगितले.

डोंबिवलीच्या कोपरगावचा रहिवाशी असलेला राजेश मुंबईतल्या मंदीर परिसरात पहाटे किंवा सायंकाळी ७ वाजता कमी वर्दळ असलेल्या ठिकाणी उभा रहायचा. तेथे कोणी वृद्ध महिला मंदीरात निघाली असल्यास तिला अडवून पुढे हत्या झाली असल्याचे सांगत स्वत:ची ओळख पोलिस अशी करून द्यायचा. नंतर आरोपी तुम्हाला ही अशा प्रकारे लुटतील असे सांगून गळ्यातील दागिने काढून घेत. ते रुमाल किंवा कागदात बांधून देण्याच्या नावाखाली हात चलाकीने काढून घ्यायचा. ऩुकतीच त्याने अशा प्रकारे विक्रोळी, भायखळा, कुर्ला, शिवाजी पार्क, दादर, कांदीवली, मालवणी या ठिकाणी अशा प्रकारे चोरी केली होती.  यासारख्या गुन्हयांची वाढती संख्या लक्षात घेता. पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश करण्याचे ठरवले आहे. अशा प्रकारचे गुन्हे मुंबईत बऱ्याच पोलीस ठाण्यात नोंद आहेत. 

दरम्यान शनिवारी सेंट जाँर्ज रुग्णालयाच्या परिसरात अशा प्रकारे पोलिसांचे नाव सांगून वृद्धांना गंडवणारा सराईत आरोपा येणार असल्याची माहिती कक्ष -1 च्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून राजेशला अटक केली. राजेश जवळून पोलिसांनी 48.8 ग्रँम सोन्याचे दागिने हस्तगत केले आहॆ. विविध गुन्ह्यात राजेशला अटक केल्यानंतर तो जामीनावर सुटायचा आणि पुन्हा चोऱ्या करायचा. एका गुन्ह्यात राजेश न्यायालयात हजरच राहत नसल्यामुळे न्यायालयाने त्याला फरार घोषित केले आहे. या प्रकरणात न्यायालयाने त्याला 13 आँगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

Web Title: police arrested fake cop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.