पाॅलिसीचे पैसे मिळवण्याच्या हेतून बहिणीचा खून करणाऱ्याच्या काेठडीत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 09:56 PM2019-04-17T21:56:01+5:302019-04-17T21:57:12+5:30

पॉलिसीचे पैसे मिळविण्याच्या हेतुने बहिणीचा गळा दाबून खुन करणा-याच्या कोठडीत 20 एप्रिल पर्यंत वाढ करण्यात आली आहे.

In order to get the money of the policy, brother murder his sister | पाॅलिसीचे पैसे मिळवण्याच्या हेतून बहिणीचा खून करणाऱ्याच्या काेठडीत वाढ

पाॅलिसीचे पैसे मिळवण्याच्या हेतून बहिणीचा खून करणाऱ्याच्या काेठडीत वाढ

Next

पुणे : पॉलिसीचे पैसे मिळविण्याच्या हेतुने बहिणीचा गळा दाबून खुन करणा-याच्या कोठडीत 20 एप्रिल पर्यंत वाढ करण्यात आली आहे. याप्रकरणी उध्दव खाडे यांनी फिर्याद दिली होती.
 
जॉन डॅनियल बोर्डे (वय 40, रा.सौंदर्य कॉलनी, नखाते वस्ती, रहाटणी) असे पोलीस कोठडीत वाढ करण्यात आलेल्याचे नाव आहे. आरोपी याने आपली  बहिण संगिता हिवाळे ही सतत पैसे मागत असल्याने तिच्याशी भांडणे केली. तसेच तिने काढलेल्या पॉलिसीचे पैसे मिळविण्याच्या उद्देशाने तिचा गळा दाबुन खुन केला. तिच्या मृत्युबाबत कोणास शंका येऊ नये म्हणून तिचा मृत्यु हा अपघाती झाला आहे असे दाखवून पुरावे नष्ट केले. तिच्या पॉलिसीचे तीस लाख रुपये मिळावे याकरिता आरोपीने बहिणीला कारमध्ये टाकुन तिला उपचारासाठी नेत असल्याचे भासवले. मात्र प्रत्यक्षात हॉस्पिटलमध्ये न जाता वाकड येथे गाडी थांबवून बहिणीचा मुलगा व आई यांना खाली उतरवले. त्यानंतर गाडीचे बोनेट उघडून बहिणीच्या अंगावर पेट्रोल टाकुन त्यांना ठार मारुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी 3 साक्षीदारांकडे तपास करण्यात आला. बहिणीच्या विम्याचे पेपर जप्त करण्यात आले.  तिचा खुन केल्यानंतर ती राहत असलेल्या दोन खोल्या या आरोपीने विसार पावती करुन विकलेल्या आहेत त्याची विसार पावती जप्त करुन कागदपत्रात सामील केली आहे.  आरोपी पोलीसांची दिशाभुल करुन खरी माहिती लपवत आहे, आरोपी याने कुठल्या पेट्रोलपंपावरुन पेट्रोल घेतले होते याबाबत माहिती देत नाही, तसेच आरोपीने त्याच्या वडिलांच्या नावे असलेली औंध येथील मिळकत विकली असून आलेल्या पैशाच्या वादातून बहिणीस मारले काय, याकारणांचा तपास करण्याकरिता कोठडीत वाढ करण्यात आली आहे. 

Web Title: In order to get the money of the policy, brother murder his sister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.