मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर रस्ता ओलांडताना एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2018 12:30 PM2018-12-17T12:30:23+5:302018-12-17T12:35:43+5:30

मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर पिंपळोली गावाच्या हद्दीत रस्ता ओलांडताना चारचाकी मोटारीची धडक बसून एकाचा मृत्यू झाला.

One death while crossing road on the highway | मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर रस्ता ओलांडताना एकाचा मृत्यू

मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर रस्ता ओलांडताना एकाचा मृत्यू

Next

कामशेत : मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर पिंपळोली गावाच्या हद्दीत रस्ता ओलांडताना चारचाकी मोटारीची धडक बसून एकाचा मृत्यू झाला.मयत हरिचंद्र अर्फ्रीलाल यादव ( वय ३९ रा. इंदिरा नगर ठाणे )कामशेतपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार ( दि.१६ ) रोजी मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हरिचंद्र अर्फ्रीलाल यादव, लालचंद रमिराज यादव, मनोजकुमार यादव ( सर्व. रा. ठाणे ) हे ठाणे येथून मुन्ना यादव यांच्या चारचाकी मोटारीने पुण्यास जाण्यास निघाले असता पिंपळोली गावाच्या हद्दीत किलोमीटर नं. ६७/२०० जवळ गाडी रोडच्या कडेला लावून पलीकडे असलेल्या मॉलकडे जाण्यासाठी रस्ता ओलांडताना हरिचंद्र यादव यांना पुणे कडून मुंबईकडे जाणाऱ्या हुंदाई कारची ( क्र.एमएच.१२. एल पी १३३७ ) या गाडीची धडक बसून अपघात झाला. या अपघातात ते जागीच मृत्यू झाले असून या प्रकरणी पुढील तपास महेंद्र वाळूंजकर करत आहेत. 

Web Title: One death while crossing road on the highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.