अनोळखी व्यक्तीशी अश्लील चॅटिंग पडलं महागात 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 08:00 PM2019-04-25T20:00:45+5:302019-04-25T20:05:33+5:30

अखेर पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश केल्यानंतर या कटामागे मित्राचाच हात असल्याचे उघड झाले.  

The obscene person was involved in obscene chatting | अनोळखी व्यक्तीशी अश्लील चॅटिंग पडलं महागात 

अनोळखी व्यक्तीशी अश्लील चॅटिंग पडलं महागात 

Next
ठळक मुद्देपवई परिसरात राहणाऱ्या तक्रारदाराच्या एका मित्राने काही दिवसांपूर्वी उपनगरात एका हाॅटेलमध्ये पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.पोलिसांनी अहमदला ताब्यात घेत खाकीचा धाक दाखवल्यानंतर अहमदच या सर्व प्रकरणामागे असल्याचे पुढे आले.

मुंबई - ओळख नसताना देखील सोशल मिडियावर तरुणीसोबत अश्लील चॅटिंग आणि विवस्त्र फोटो शेअर करणे पवईतील एका तरुणाला चांगलंच महागात पडलं. याच फोटोच्या मदतीने ब्लॅकमेल करून तरुणीने ८ लाखांची खंडणी मागण्यास सुरूवात केली. अखेर पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश केल्यानंतर या कटामागे मित्राचाच हात असल्याचे उघड झाले.  

पवई परिसरात राहणाऱ्या तक्रारदाराच्या एका मित्राने काही दिवसांपूर्वी उपनगरात एका हाॅटेलमध्ये पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी तक्रारदाराशी  एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याची ओळख अहमद श्यमुअल हक (३२) याच्याशी करून दिली. अहमदने एमबीएचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यावेळी दोघांनी एकमेकांना नंबर दिले होते. काही दिवसांनी तक्रारदाराच्या मोबाइलवर एका अनोळखी नंबरहून मेसेज आला. त्यावेळी त्या अनोळखी व्यक्तीने हकने नंबर दिल्याचं सांगितले. त्यानुसार तक्रारदार समोरील अज्ञात तरुणीशी बोलू लागला. कालांतराने दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. त्याने तरुणीकडे भेटण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, तरुणी वारंवार त्याला टाळायची. कालांतराने दोघेही अश्लील गोष्टींबाबत बोलू लागले. त्यावेळी तरुणीने तक्रारदाराला त्याचे नग्न फोटो मागितले. तक्रारदाराने फोटो तिला व्हाॅट्स अॅप केले. ते फोटो पाठवल्याच्या दुसऱ्याच दिवसापासून त्या फोटोंच्या सहाय्याने ब्लॅकमेल करून तरुणीने खंडणी मागण्यास सुरूवात केली. पैसे न दिल्यास सर्व फोटो सोशल मिडियावर टाकून बदनामी करण्याची धमकी तक्रारदाराला देत होती. त्यावेळी तक्रारदाराने अहमदला हा सर्व प्रकार सांगून मदतीचे आवाहन केले. अहमदने काही तासांनी पुन्हा तक्रारदाराला फोन करून ती तरुणी ८ लाख रुपये मागत असल्याचे सांगितले. तक्रारदाराने अखेर अहमदला तरुणीला समोरासमोर भेटण्याची अट टाकत पैसे देण्याची तयारी दाखवली. मात्र, अहमद तरुणी समोर येण्यास तयार नसल्याचे कारण पुढे करू लागल्याने अहमदच्या वागण्यावर तक्रारदाराच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. अखेर एका मित्राच्या मदतीने तक्रारदाराने खंडणी विरोधी पथकातील पोलिसांकडे मदत मागितली. पोलिसांनी रितसर गुन्हा नोंदवून तपासाला सुरूवात केली. तक्रारदाराला येणाऱ्या मेसेजच्या टाॅवर लोकेशनजवळ वारंवार अहमदचेच लोकेशन येत असल्याने पोलिसांचा अहमदवरील संशय बळावला. पोलिसांनी अहमदला ताब्यात घेत खाकीचा धाक दाखवल्यानंतर अहमदच या सर्व प्रकरणामागे असल्याचे पुढे आले. अहमदजवळ दोन मोबाइल असून दुसऱ्या मोबाइलवरून तो तक्रारदाराची फसवणूक करत असल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली आहे. या प्रकरणी खंडणी विरोधी पथकाचे पोलीस अधिक तपास करत आहेत.  

 

Web Title: The obscene person was involved in obscene chatting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.