पिंपरीत डोक्यात दगड घालून पतीचा खून 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 04:35 PM2019-02-19T16:35:52+5:302019-02-19T16:36:34+5:30

दारु पिऊन त्रास देणाऱ्या पतीचा पत्नीने डोक्यात दगड घालून खून केला.

murdred of wife by husband at pimpri chinchwad | पिंपरीत डोक्यात दगड घालून पतीचा खून 

पिंपरीत डोक्यात दगड घालून पतीचा खून 

Next

पिंपरी : दारु पिऊन त्रास देणाऱ्या पतीचा पत्नीने डोक्यात दगड घालून खून केला. ही घटना सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास हिंजवडी पोलीस ठाणे हद्दीतील पांढरे वस्ती पुनावळे येथे घडली. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गजानन जमुनाप्रसाद निषाद (वय २८, रा. पांढरे वस्ती, पुनावळे. मूळ रा. छत्तीसगड) असे खून झालेल्याचे नाव आहे. पोलिसांनी पत्नी रानौ गजानन निषाद (वय २४, रा. पांढरे वस्ती, पुनावळे. मूळ रा. छत्तीसगड) हिस अटक केली आहे.
गजानन आणि रानौ हे दोघे पती-पत्नी पुनवळेत राहत होते.  ते कामासाठी पुण्यात आले होते.  सध्या पुनावळे येथील कैलास हिंदुजा यांच्या जागेत असलेल्या लेबर कॅम्पमध्ये ते राहत होते. त्यांना दिड वषार्ची मुलगी आहे. गजानन याला दारुचे व्यसन होते. तो वारंवार दारु पिऊन पत्नी रानौला मारहाण करुन त्रास द्यायाचा. सोमवारी  त्या दोघांमध्ये भांडण झाले. या कारणावरुन रानौ हीने गजाननच्या डोक्यात  दगड मारुन त्याचा खून केला. याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत. 

Web Title: murdred of wife by husband at pimpri chinchwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.