मुंबईत धाड...२ कोटींच्या इंपोर्टेड सिगारेट आणि १ कोटी रुपये जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2018 08:10 PM2018-08-21T20:10:50+5:302018-08-21T20:11:20+5:30

मुसाफिरखान येथे डीआरआयने केली छापेमारी आणि करोडो रुपये केले जप्त 

In Mumbai Raid ... 2 crores of imported cigarettes and one crore rupees were seized |  मुंबईत धाड...२ कोटींच्या इंपोर्टेड सिगारेट आणि १ कोटी रुपये जप्त

 मुंबईत धाड...२ कोटींच्या इंपोर्टेड सिगारेट आणि १ कोटी रुपये जप्त

googlenewsNext

मुंबई - मुसाफिरखान येथे धाड घालत महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) १ कोटी ७ लाख रुपयांची रोकड आणि २ कोटी ३१ लाख रुपयांच्या  इंपोर्टेड सिगारेट जप्त केल्या आहेत. संपूर्ण मुंबई शहरात इंपोर्टेड सिगारेट पुरविणारा वितरकाचे पाच ते सहा गोडाऊनवर डीआरआयने धाडी घालत मोठी कारवाई केली आहे. तसेच वितरक असलेल्या दोघांना डीआरआयने अटक केली आहे. 

७५ एमएम आणि त्यापेक्षा अधिक लांबीच्या ७ लाख ३२ हजार ६४० सिगारेट डीआरआयने जप्त केल्या आहेत. या जप्त केलेल्या परदेशी बनावटीच्या इंपोर्टेड सिगारेटची किंमत २ कोटी ३१ लाख इतकी आहे. तर गोडाऊनमध्ये डीआरआयच्या अधिकाऱ्यांना भारतीय चलनातील १ कोटी ७ लाख रुपयांच्या नोटा हस्तगत केल्या आहेत. दिल्लीतील एक इसम देखील इंपोर्टेड सिगारेट तस्करी करण्यात सामील आहे. मोर्लबोरो, मोर, बेन्सन हजेस, रॉथमन्स, गुडन गरम अशा इंपोर्टेड सिगारेट या धाडीत जप्त करण्यात आल्या आहेत. 

Web Title: In Mumbai Raid ... 2 crores of imported cigarettes and one crore rupees were seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.