अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून व्हिडिओ, फोटो व्हायरल करण्याची धमकी; आरोपीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2019 02:04 PM2019-05-17T14:04:27+5:302019-05-17T14:06:14+5:30

अल्पवयीन मुलगी शाळेत जात असताना तो नेहमी तिचा पाठलाग करायचा. एकेदिवशी तिला बाहेर फिरायला घेऊन जाऊन बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले...

Minor girl raped and after video viral threatens ; The accused arrested | अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून व्हिडिओ, फोटो व्हायरल करण्याची धमकी; आरोपीला अटक

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून व्हिडिओ, फोटो व्हायरल करण्याची धमकी; आरोपीला अटक

Next

पिंपरी : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिच्या आई-वडील, बहिणीला जीवे मारण्याची आणि बलात्काराचा व्हिडिओ, फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन पुन्हा शरीरसंबंध ठेण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या नराधमाला चिखली पोलिसांनी गजाआड केले.
  कुलदिप सुभाष धुमाळ (वय २८, रा. घरकुल, चिखली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित मुलीने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.  पीडित मुलगी आणि आरोपी हे ओळखीचे आहेत. कुलदिपने पीडित मुलीला फूस  लावून मैत्रीच्या जाळ्यात ओढले. अल्पवयीन मुलगी शाळेत जात असताना तो नेहमी तिचा पाठलाग करायचा. एकेदिवशी तिला बाहेर फिरायला घेऊन जाऊन बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले. त्याचे अश्लील व्हिडिओ व फोटो काढले. संबंधित घटना पीडित मुलीने आई - वडिलांना सांगितली. तेव्हा पीडित मुलीच्या आई-वडील आणि बहिणीला कुलदिपने जीवे मारण्याची धमकी दिली. पीडित अल्पवयीन मुलीसोबत व्हिडिओ आणि फोटो तिच्या मोबाईलवर पाठवून पुन्हा शारीरिक संबंधाची मागणी केली. मुलगी घाबरली होती. तिने त्यास नकार दिला असता हेच फोटो पीडित मुलीच्या मावस भावाला पाठवले. अखेर मुलीने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केले.

Web Title: Minor girl raped and after video viral threatens ; The accused arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.