पोलीस दलात सुद्धा MeTooची एण्ट्री; कारागृहातील महिला कर्मचाऱ्याने केला कारागृह अधीक्षकावर आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2018 07:34 PM2018-10-18T19:34:03+5:302018-10-18T19:35:25+5:30

या प्रकरणाची चौकशी करून पीडित महिलेला न्याय मिळवून देण्याची मागणी वाघमारे यांनी केली आहे.

MeToo's entry in the police station; The accused in jail jail has been accused by the jail superintendent | पोलीस दलात सुद्धा MeTooची एण्ट्री; कारागृहातील महिला कर्मचाऱ्याने केला कारागृह अधीक्षकावर आरोप 

पोलीस दलात सुद्धा MeTooची एण्ट्री; कारागृहातील महिला कर्मचाऱ्याने केला कारागृह अधीक्षकावर आरोप 

googlenewsNext

ठाणे - सध्या बॉलिवूडमध्ये पेव फुटलेल्या MeToo प्रकरण गाजत असताना ठाण्यातील कारागृहातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ठाणे कारागृहामध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याने कारागृह अधीक्षक नितीन वायचळ यांच्यावर शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने केला आहे. महिला कर्मचाऱ्याच्या भाऊ शादाब पिंजारी यांनी आपल्या बहिणीवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आवाज उठवला आणि मदतीसाठी काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांच्याकडे धाव घेतली. त्यानंतर वाघमारे यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक राजवर्धन यांच्याकडे  याबाबत लेखी तक्रार केली आहे. या प्रकरणाची चौकशी करून पीडित महिलेला न्याय मिळवून देण्याची मागणी वाघमारे यांनी केली आहे.

 

Web Title: MeToo's entry in the police station; The accused in jail jail has been accused by the jail superintendent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.