लग्नाचे आमिष दाखवत तरुणीवर बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2018 04:22 AM2018-12-23T04:22:46+5:302018-12-23T04:22:58+5:30

नामांकित विमान कंपनीत काम करत असल्याचे सांगत तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार करून तिला सहा लाखांचा चुना लावला.

 Marriage rape rape woman | लग्नाचे आमिष दाखवत तरुणीवर बलात्कार

लग्नाचे आमिष दाखवत तरुणीवर बलात्कार

googlenewsNext

मुंबई : नामांकित विमान कंपनीत काम करत असल्याचे सांगत तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार करून तिला सहा लाखांचा चुना लावला. या प्रकरणी तिने एका इसमाविरोधात दिंडोशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून त्याला शुक्रवारी अटक करण्यात आली आहे. अश्विन पांडे (२५) असे अटक केलेल्या इसमाचे नाव आहे. तो चारकोप परिसरात राहतो.
दिंडोशीमध्ये राहणारी तरुणी निशा (नावात बदल) आणि पांडे एकाच कंपनीत काम करत होते. मात्र नंतर निशाला दुसऱ्या कंपनीत नोकरी मिळाली. पांडे तिच्या संपर्कात होता आणि त्याला जेट एअरवेजमध्ये नोकरी मिळाल्याचे त्याने निशाला सांगितले. यादरम्यान त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. लग्न करण्याचे आमिष दाखवत पांडेने निशासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच पैशांची मागणीही सातत्याने केली.
एक दिवस त्याच्या मोबाइलवर एका तरुणीचा मेसेज तिने वाचला. त्यावरून त्याचे दुसºया मुलीशीही प्रेमसंबंध सुरू असल्याचे तिला समजले. त्यावरून त्यांच्यात वाजले. तेव्हा पांडे विवाहित असून न्यायालयात त्याच्या घटस्फोटाचा खटला सुरू आहे आणि तो निशाची फसवणूक करत असल्याचेही तिला समजले. त्यामुळे त्याला दिलेले पैसे निशाने परत मागितले. मात्र तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. अखेर तिने पोलिसांत तक्रार दाखल केली. न्यायालयाने २५ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश याप्रकरणी दिले.

Web Title:  Marriage rape rape woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.