दीडशेहून अधिक तरुणांची नोकरीचं आमिष दाखवून लूट; पोलिसांनी दोघांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 09:09 PM2019-02-04T21:09:56+5:302019-02-04T21:13:21+5:30

पोलिसांनी त्यांना पकडण्यासाठी मोहिम हाती घेतली असून वेगाने काम सुरू आहे.

Looted for more than 150 years of job; Police arrested both | दीडशेहून अधिक तरुणांची नोकरीचं आमिष दाखवून लूट; पोलिसांनी दोघांना अटक 

दीडशेहून अधिक तरुणांची नोकरीचं आमिष दाखवून लूट; पोलिसांनी दोघांना अटक 

Next
ठळक मुद्देसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भागीरथ त्यागी आणि झाकिर हुसेन असं अटकेत असलेल्या आरोपींची नावं आहेत. सध्या हे आरोपी पोलिसांच्या तावडीत सापडले आहेत. दोघेही अट्टल गुन्हेगार आहेत.आपली फसवणूक होत आहे हे लक्षात आल्यानंतर एका तरुणाने याबाबत पायधुनी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी याबाबत कारवाई केली. त्यानंतर या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली.

मुंबई - नोकरीचं आमिष दाखवून तरुणांना लुटणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांची ही कामगिरी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या टोळीतील दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. टोळीतील इतर आरोपी पसार असल्याचे समजत आहे. धक्कादायक म्हणजे या टोळीने दीडशेहून अधिक तरुणांना आतापर्यंत गंडवलं आहे. फसवणूक करणाऱ्या या टोळीचं मुंबईसह महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशात हे रॅकेट पसरलं आहे. आतापर्यंत टोळीने जवळपास दीडशेहून जास्त तरुणांना गंडा घातल्याचा संशय आहे. या टोळीतील दोन आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत. परंतु या टोळीतील इतर सहकारी मात्र पसार असल्याचे समजत आहे. पोलिसांनी त्यांना पकडण्यासाठी मोहिम हाती घेतली असून वेगाने काम सुरू आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भागीरथ त्यागी आणि झाकिर हुसेन असं अटकेत असलेल्या आरोपींची नावं आहेत. सध्या हे आरोपी पोलिसांच्या तावडीत सापडले आहेत. दोघेही अट्टल गुन्हेगार आहेत. या दोघांनी नोकरीचं आमिष दाखवून अनेकांना गंडा घातला आहे. सध्या हे पाेलिसांच्या ताब्यात असून या प्रकरणाची अधिक चौकशी पोलीस करत आहेत. या दोघांनी यासाठी एक काॅल सेंटरही सुरू केलं होतं. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांची माहिती काढून त्यांना ते एका तरुणीद्वारे काॅल करत. त्यांना नोकरीचे आमिष दाखवत. शिवाय मुलाखती, परदेशात जाण्यासाठी तिकीटाच्या नावावर तरुणांकडून पैसे उकळण्याचा प्रकार होत होता. त्यांच्याकडून मोठी रक्कम उकळल्यानंंतरही तरुणांच्या हाती काही पडत नसे. आपली फसवणूक होत आहे हे लक्षात आल्यानंतर एका तरुणाने याबाबत पायधुनी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी याबाबत कारवाई केली. त्यानंतर या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली.

Web Title: Looted for more than 150 years of job; Police arrested both

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.