London court bust; Neeru Modi's bail plea rejected | लंडन कोर्टाचा दणका; नीरव मोदीचा जामीन फेटाळला 
लंडन कोर्टाचा दणका; नीरव मोदीचा जामीन फेटाळला 

ठळक मुद्देनीरव मोदी लंडनमधील वेस्ट एंड परिसरातील सुमारे ७३ कोटी रूपये किंमत असलेल्या अपार्टमेंटमध्ये राहत असल्याचे सांगण्यात येते. कोर्टाने नीरव मोदीचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

लंडन - पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी फरार हिरे व्यापारी नीरव मोदी याला लंडन येथून आज अटक करण्यात आली. अटकेनंतर वेस्टमिन्स्टर कोर्टात नीरव मोदीला हजर करण्यात आले. याप्रकरणी आता पुढील सुनावणी २९ मार्च रोजी होणार आहे. तसेच कोर्टाने नीरव मोदीचा जामीन अर्ज फेटाळला आहे. नीरव मोदीविरोधात लंडनमधील वेस्टमिन्स्टर कोर्टाने अटक वॉरंट जारी केले होते. भारतात प्रत्यार्पण प्रकरणाची सुनावणी आता कोर्टात केली जाणार आहे. अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) नीरव मोदीची संपत्ती विकली जाऊ शकते. सुनावणीदरम्यान नीरव मोदीने जामिनाची विनंती केली. तपास यंत्रणांना आपले पूर्ण सहकार्य राहील. प्रवासासंबंधीचे सर्व कागदपत्रे मी सादर करेन असे त्याने कोर्टात स्पष्ट केले. मात्र, कोर्टाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला आहे. नीरव मोदी लंडनमधील वेस्ट एंड परिसरातील सुमारे ७३ कोटी रूपये किंमत असलेल्या अपार्टमेंटमध्ये राहत असल्याचे सांगण्यात येते.  
 


Web Title: London court bust; Neeru Modi's bail plea rejected
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.