चोक्सीच्या जमिनीचा परवाना रद्द, उद्योग विकास आयुक्तांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2019 06:13 AM2019-02-08T06:13:38+5:302019-02-08T06:13:59+5:30

पीएनबी बँक घोटाळ्यातील फरार आरोपी मेहुल चोक्सीची सुमारे २६ एकर जमीन रायगड जिह्यातील पनवेल तालुक्यात असल्याचे उघड झाल्यावर रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी तसा अहवाल पनवेल तहसील कार्यालयाकडून मागविला आहे.

land cancellation, action of Industries Development Commissioner | चोक्सीच्या जमिनीचा परवाना रद्द, उद्योग विकास आयुक्तांची कारवाई

चोक्सीच्या जमिनीचा परवाना रद्द, उद्योग विकास आयुक्तांची कारवाई

Next

- वैभव गायकर

पनवेल  - पीएनबी बँक घोटाळ्यातील फरार आरोपी मेहुल चोक्सीची सुमारे २६ एकर जमीन रायगड जिह्यातील पनवेल तालुक्यात असल्याचे उघड झाल्यावर रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी तसा अहवाल पनवेल तहसील कार्यालयाकडून मागविला आहे. तर या जागेकरिता चोक्सीने मिळविलेला औद्योगिक वापराकरिता परवाना उद्योग विकास आयुक्तांकडून रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खोटी माहिती देऊन चोक्सीने हा औद्योगिक वापर परवाना मिळविल्याचे उघड झाले आहे.

चोक्सीने गीतांजली जेम्स लिमिटेड या नावाने औद्योगिक वापर परवाना मिळविला होता. मात्र, संबंधित जमीन चोक्सीच्या नावावर असल्याने उद्योग विकास आयुक्तांनी या संदर्भात रायगड जिल्हाधिकाºयाकडे संबंधित जमिनीचा अहवाल मागविला होता. जिल्हाधिकाºयांनी पनवेल तहसील कार्यालयाला गीतांजली जेम्स लिमिटेड या नावाने पनवेल तालुक्यात किती जमीन आहे, याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.

पनवेल तहसील कार्यालयाने याबाबत छाननी केली असता, चिरवत व सांगुर्ली या गावांमध्ये एकूण २० सात-बारा चोक्सीच्या नावावर असल्याचे उघडकीस झाले. एकूण २६ सात-बारापैकी पाच सात-बारा इतर व्यक्तींच्या नावावर आहेत, तर एका सात-बाराची नोंद सापडत नसल्याचा अहवाल पनवेल तहसील
कार्यालयाने रायगड जिल्हाधिकाºयांना पाठविला.

२००६ मध्ये मेहुल चोक्सीने ही जमीन खरेदी केल्याचे समजते. या कार्यकाळात चोक्सीने पीएनबीकडून कर्ज घेतल्याचे समजते. मुंबई-गोवा महामार्गाजवळ मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या जागेवर चोक्सीला मोठा प्रकल्प उभारायचा होता. त्या उद्देशानेच चोक्सीने उद्योग विकास आयुक्तांकडून परवाना मिळविला होता.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या परिसरात होऊ घातल्याने अनेक बड्या विकासकांनी व उद्योजकांनी पनवेल परिसरात जमिनी खरेदी केल्या आहेत. या ठिकाणी अनेक मोठे प्रकल्प उभे राहिले आहेत. याच अनुषंगानेच चोक्सीने ही जमीन खरेदी केली होती. चोक्सीने घेतलेले कर्जाचे पैसे अनेक ठिकाणी वळते केल्याचे समजते आहे.

औद्योगिक परवान्याबाबत संशय

गीतांजली जेम्स लिमिटेडला औद्योगिक विकास आयुक्तांनी परवाना दिल्याचे उघड झाले आहे. मात्र, संबंधित जागा मेहुल चोक्सीच्या नावावर असताना उद्योग विकास आयुक्तांनी गीतांजली जेम्स लिमिटेडला परवाना दिलाच कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. परवाना मिळविताना चोक्सीने उद्योग विकास आयुक्तांची दिशाभूल केल्याची शक्यता आहे. हा दंडनीय अपराध असल्याने त्याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.

सेबीने घेतले सात-बारा ताब्यात
मेहुल चोक्सीचा पीएनबीतील घोटाळा बाहेर आल्यानंतर सेबीने चोक्सीच्या अनेक मालमत्तांवर छापा टाकला. या घोटाळ्यानंतर पनवेलमधील जमिनीचे सात-बारादेखील सेबीने शिरढोण तलाठी कार्यालयातून ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

जिल्हाधिकाºयांनी गीतांजली जेम्स लिमिटेड या नावाने पनवेल तालुक्यात किती जागा असल्याचा अहवाल मागविला. मात्र, या नावाने जमिनी नसल्याचा अहवाल आम्ही जिल्हाधिकाºयांना पाठविला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून काही सर्वे नंबर आमच्याकडे पाठविण्यात आले, त्यानुसार संबंधित सर्वे नंबर हे मेहुल चोक्सीच्या नावावर असल्याचा अहवाल जिल्हाधिकाºयांना दिला आहे. - दीपक आकडे, तहसीलदार, पनवेल

Web Title: land cancellation, action of Industries Development Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.