अपहरण करून जीवघेणा हल्ला : वर्चस्ववादातून घडला प्रकार 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2019 11:56 AM2019-06-18T11:56:14+5:302019-06-18T11:57:22+5:30

आरोपी व फिर्यादी हे एकमेकांच्या परिचयाचे असून, मागील काही दिवसांपूर्वी त्यांच्यामध्ये भांडणे झाली होती.

kidnapping and dangerous Attack by criminals in pune | अपहरण करून जीवघेणा हल्ला : वर्चस्ववादातून घडला प्रकार 

अपहरण करून जीवघेणा हल्ला : वर्चस्ववादातून घडला प्रकार 

googlenewsNext
ठळक मुद्देहडपसरमध्ये घडला़ प्रकार : चौघांना अटक

पुणे: वर्चस्ववादातून आठ ते दहा जणांच्या टोळक्याने तिघांना कोयता व लाकडी दांडक्याने मारहाण करत त्याच्यावर जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार हडपसरमध्ये घडला़. त्यांच्यातील एकाचे अपहरण करुन त्याला मारहाण केल्यावर बोपदेव घाटात सोडून दिले होते़.  याप्रकरणी हडपसरपोलिसांनी अमर काशीनाथ शिंगे (वय २०),मलक्काप्पा आण्णाराव बनसोडे (वय २२, दोघेही रा़ होळकरवाडी), अशोक भरेकर (वय २७, रा. हांडेवाडी चौक), शांताराम काळे (वय २०, रा. तुकाई दर्शन) या चौघांना अटक केली आहे़. त्याचे अन्य साथीदार फरार आहेत़ याप्रकरणी रोहित जगताप (वय २४, रा़ भेकराईनगर फुरसुंगी) यांनी फिर्याद दिली आहे़. हा प्रकार हडपसरमधील हांडेवाडी चौकाजवळ १५ जूनला रात्री साडेअकरा वाजता घडला़. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व फिर्यादी हे एकमेकांच्या परिचयाचे असून, मागील काही दिवसांपूर्वी त्यांच्यामध्ये भांडणे झाली होती. त्यातूनच हा प्रकार झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.  जगताप हे त्यांच्या इतर दोन मित्रांसह याच परिसरातील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. त्यानंतर ते त्यांच्या एका मित्राला सोडण्यासाठी हांडेवाडी चौकात आले. दरम्यान रात्री साडेअकराच्या सुमारास एक काळ्या रंगाच्या स्कोडा गाडी व रिक्षातून सात ते आठ जण खाली उतरले व त्यांनी जगताप यांची दुचाकी अडवली. त्यामध्ये जगताप यांच्या ओळखीचा सागर अवताडे हा कोयता घेऊन  होता. त्यानंतर जगताप यांचा मित्र नारायण पुरी याला गाडीवरुन खाली ओढण्याचा प्रयत्न आरोपींनी केला. तेव्हा जगताप त्याला सोडविण्यास गेले़ त्यावेळी औताडे याने जगताप यांच्यासह त्यांचा दुसरा मित्र सलीम तांबोळी याला लाकडी दांडक्याने व उलट्या कोयत्याने मारहाण केली. तसेच जगताप यांना जिवे मारण्याची धमकी देत  पुरी याला बळजबरीने गाडीत घालून घेऊन गेले. त्यानंतर जगतापने झालेल्या प्रकाराची माहिती शंभर नंबरला कॉल करुन पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी मिळालेल्या माहितीवरून शिंदे याला अटक केली. 
पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केल्यानंतर सहायक निरीक्षक संजय चव्हाण  यांनी आपल्या पथकासह तेथे धाव घेतली़ मात्र, अपहरण केलेल्या तरुणाचा शोध काही लागत नव्हता. शेवटी पुरीकडे असलेल्या मोबाईलवरून त्याचे लोकेशन काढले़ तेव्हा ते बोपदेव घाटाच्या परिसरात आढळून आले. त्यानुसार त्याचा शोध घेतला तेव्हा मिळून आला. आरोपींनी बेदम मारहाण केल्यामुळे पुरी गंभीर जखमी असून, त्याला  उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे़. 

Web Title: kidnapping and dangerous Attack by criminals in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.