करण ओबेरॉय प्रकरण : फरार वकिलाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2019 08:47 PM2019-06-03T20:47:56+5:302019-06-03T20:52:16+5:30

अटक वकिलाचे नाव अली काशिफ खान असं आहे.

Karan Oberoi Case: The absconding advocate arrested by oshiwara police | करण ओबेरॉय प्रकरण : फरार वकिलाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

करण ओबेरॉय प्रकरण : फरार वकिलाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

Next
ठळक मुद्देतक्रारदार महिलेच्या वकिलाने हा कट रचल्याचं पोलीस तपासत उघड झालं. या हल्ल्यासाठी वकील अली काशिफ खानने आपल्याला पैसेही दिले होते

मुंबई - अभिनेता करण ओबेरॉय प्रकरणातील बलात्कार पीडित महिलेवर हल्ला घडवून आणणाऱ्या फरार वकिलाला अखेर ओशिवरा पोलिसांकडूनअटक करण्यात आली आहे. महिलेवर हल्ला घडवून आणून सहाभूती मिळविणाऱ्या हा अटकवकिलाचे नाव अली काशिफ खान असं आहे. 

अभिनेता करण ओबेरॉय याच्यावर बलात्कार आणि मारहाणीचा आरोप करणाऱ्या महिलेवर गेल्या शनिवारी काही जणांनी जीवघेणा हल्ला केला. मात्र, हा हल्ल्या तक्रारदार महिलेच्यात वकिलाने घडवून आणल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात महिलेला सहानुभूती मिळावी याकरिता तक्रारदार महिलेच्या वकिलाने हा कट रचल्याचं पोलीस तपासत उघड झालं. तक्रारदार महिलेवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी जिशान अन्सारी (२३) अल्तमाश ( २२) जितीन संतोष कुरीयन (२२) आणि अराफत अहमद अली (२२) या चौघांना पोलिसांनी अटक केली होती. हे सगळेजण कॉलेजला जाणारे विद्यार्थी असल्याचं तपासात समोर आलं आणि अधिक महत्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले. अटक झालेल्यांपैकी अराफत अली हा महिलेचा वकील अली काशिफ खानचा नातेवाईक असून वकील खाननेच महिलेवर हल्ला करण्याचे काम दिले असल्याचे अराफतने पोलिसांना सांगितले होते. तसेच या हल्ल्यासाठी वकील अली काशिफ खानने आपल्याला पैसेही दिले होते असे पुढे अराफतने पोलिसांना सांगितले आणि त्यानुसार ओशिवरा पोलिसांनी वकील खानला अटक केली आहे.

अटक केलेल्यांपैकी अन्सारी आणि अल्तमाश हे महिलेला प्रत्यक्ष मारहाण करण्यात सहभागी नव्हते. मात्र ते हल्ल्याच्या कटात सहभागी असल्याचे त्यांनाही अटक करण्यात आली आहे. तक्रारदार महिला मॉर्निंगवॉकला जात असताना तिच्यावर हल्ला करण्यात आला होता. हल्लेखोरांपैकी जितीन कुरिअनने महिलेच्या अंगावर ऍसिड ओतण्याची धमकी दिली होती. करणविरोधातील खटला मागे घे असं हल्लेखोर तक्रारदार महिलेला धमकावत होते अशी तक्रार या महिलेने पोलिसांत दिली होती. या हल्ल्यामागचा उद्देश आता स्पष्ट झाला असून पोलीस सध्या हल्ल्याचा कट रचणाऱ्या अली काशिफ खान या वकिलाला शोधत होते. 



 

Web Title: Karan Oberoi Case: The absconding advocate arrested by oshiwara police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.