जे. डे. हत्याकांड : जिग्ना व्होराला मोठा दिलासा; सीबीआयकडे पुरेसे पुरावे नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2019 07:07 PM2019-08-27T19:07:38+5:302019-08-27T19:10:40+5:30

जे. डे.  हत्याकांडात छोटा राजनसह अन्य काही मारेकऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 

J. Day murder case: Big relief to Jigna Vora; The CBI does not have sufficient evidence | जे. डे. हत्याकांड : जिग्ना व्होराला मोठा दिलासा; सीबीआयकडे पुरेसे पुरावे नाहीत

जे. डे. हत्याकांड : जिग्ना व्होराला मोठा दिलासा; सीबीआयकडे पुरेसे पुरावे नाहीत

googlenewsNext
ठळक मुद्दे सत्र न्यायालयाच्या निर्दोषमुक्तीला सीबीआयने हायकोर्टात आव्हान दाखल केले होते हे आव्हान हायकोर्टाने जिग्ना व्होराविरोधात सीबीआयकडे पुरेसे पुरावे नाहीत म्हणून फेटाळले आहे. जे. डेंची माहिती अंडरवर्ड डॉन छोटा राजनला पुरवल्याचा जिग्नावर होता ठपका होता. 

मुंबई - जे. डे. हत्याकांड : पत्रकार जिग्ना व्होराच्या आरोपमुक्तीविरोधात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) मुंबई हायकोर्टात आव्हान याचिका दाखल केली आहे. आज सुनावणीदरम्यान ही सीबीआयची याचिका हायकोर्टाने फेटाळली आहे. त्यामुळे जे. डे. हत्याकांडप्रकरणी पत्रकार जिग्ना व्होराला हायकोर्टाचा मोठा दिलासा मिळाला आहे मुंबई सत्र न्यायालयाने जिग्नाला या हत्याकांडातून आरोपमुक्त केले असून या सत्र न्यायालयाच्या निर्दोषमुक्तीला सीबीआयने हायकोर्टात आव्हान दाखल केले होते आणि हे आव्हान हायकोर्टाने जिग्ना व्होराविरोधात सीबीआयकडे पुरेसे पुरावे नाहीत म्हणून फेटाळले आहे. जे. डेंची माहिती अंडरवर्ड डॉन छोटा राजनला पुरवल्याचा जिग्नावर होता ठपका होता. जे. डे.  हत्याकांडात छोटा राजनसह अन्य काही मारेकऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 

तसेच, जे. डे. हत्याकांडप्रकरणी निर्दोष सुटलेल्या पत्रकार जिग्ना व्होरासह जॉन पॉल्सन जोसेफ यांच्या दोषमुक्तीला सीबीआयकडून हायकोर्टात आव्हान याचिका दाखल करण्यात आली होती. कुख्यात गुंड छोटा राजनसह कोर्टाने सर्व ९ दोषी आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून पत्रकार जिग्ना आणि पॉल्सन जोसेफ यांना निर्दोष मुक्त केले होते. पत्रकार जे. डे. हत्याप्रकरणात मोक्का कोर्टाने अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनसह ९ दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या हत्या प्रकरणातील आरोपी पत्रकार जिग्ना वोरा आणि पॉलसन जोसेफ यांना कोर्टाने दोषमुक्त केले होते.

Web Title: J. Day murder case: Big relief to Jigna Vora; The CBI does not have sufficient evidence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.