शारीरिक संबंधास नकार दिल्याने पतीने पत्नीचा केला खून

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 09:10 PM2019-03-25T21:10:32+5:302019-03-25T21:17:22+5:30

पत्नी के.बिंदु हिचा खून केल्यानंतर पती अशोक कुमार स्वत: पोलिसांच्या शरण जाऊन त्यांने खूनाची केली कबुली

Husband's wife murdered by refusing physical relation | शारीरिक संबंधास नकार दिल्याने पतीने पत्नीचा केला खून

शारीरिक संबंधास नकार दिल्याने पतीने पत्नीचा केला खून

Next
ठळक मुद्देआपल्याला पत्नीने शारीरिक संबंधासाठी नकार देऊन उलससुलट बोलण्यास सुरू केल्याने याच्या रागात आपण तिचा खून केल्याची माहिती शरण आल्यानंतर अशोक यांनी वेर्णा पोलिसांना दिली.पोलीस निरीक्षक संदेश चोडणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी रात्री ११ वाजता या खूनाची घटना घडली.

वास्को - दक्षिण गोव्यातील झरींत, झुआरीनगर येथे राहणाऱ्या अशोक पंचनाम कुमार यांने रविवारी (२४ मार्च) रात्री आपल्या पत्नीशी भांडण करून तिचा गळा आवळून खून केल्यानंतर स्वत: पोलिसांना शरणागत जाऊन ह्या खूनाची कबूली दिली. आपल्याला पत्नीने शारीरिक संबंधासाठी नकार देऊन उलससुलट बोलण्यास सुरू केल्याने याच्या रागात आपण तिचा खून केल्याची माहिती शरणागत आल्यानंतर अशोक यांनी वेर्णा पोलिसांना दिली.
पोलीस निरीक्षक संदेश चोडणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी रात्री ११ वाजता या खूनाची घटना घडली. ३५ वर्षीय अशोक कुमार यांने सोमवारी (२५ मार्च) मध्यरात्री बिर्ला पोलीस चौकीत जाऊन येथे असलेल्या पोलीसांना आपण आपली पत्नी के.बिंदु  (३९) हिचा गळा आवळून खून केला असल्याची माहिती देऊन तो पोलीसांच्या शरण आला. खूनाची माहिती मिळताच वेर्णा पोलीस अधिकाऱ्यांनी त्वरित घटनास्थळावर दाखल होऊन बिंदू हीच्या मृतदेहाचा पंचनामा करून नंतर तो शवचिकित्सेसाठी बांबोळीच्या गो.मॅ.कॉ इस्पितळात पाठवून दिला. रविवारी आपण आपल्या पत्नीशी शाररिक संबंध करण्याची इच्छा व्यक्त केली, मात्र तिने यास विरोध करून आपल्याशी वाद घालण्यास सुरू केल्याची जबाब अशोक ने देऊन ह्याच रागाने आपण तिचा गळा आवळून खून केल्याचे पोलीसांना माहितीत सांगितले आहे. अशोक व त्याची पत्नी बिंदु यांना एक ५ वर्षीय मुलगी व ३ वर्षाचा मुलगा असून खून करण्याच्या वेळी त्यांची मुले घरात गाळ झोपली होती असे पोलिसांना तपासात उघड झाले आहे. तसेच बिंदु यांची आई के.व्ही मेरी ही त्यांच्या घराच्या बाजूलाच असलेल्या खोलीत राहत असून ही घटना घडली तेव्हा ती सुद्धा गाळ झोपेत असल्याचे पोलीसांना तपासात कळले आहे. अशोक हा मूळ ओडीसा येथील रहीवाशी असून मागच्या दहा वर्षापासून तो गोव्यात राहतो. तो टँकरवर क्लीनर म्हणून काम करत असल्याची माहिती पोलीसांना तपासणीच्या वेळी उघड झाली आहे. त्याची पत्नी बिंदू मूळ केरळ येथील असून सात वर्षापूर्वी दोघांचा विवाह झाला असल्याचे समजल्याची माहिती पोलीस निरीक्षक चोडणकर यांनी दिली.

ह्या खून प्रकरणात वेर्णा पोलीसांनी अशोक याच्याविरुद्ध भादस ३०२ कलमाखाली गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्यात आल्याची माहिती निरीक्षक चोडणकर यांनी दिली. खून झालेल्या बिंदू हिच्या लहान मुलांना तिची आई केव्ही मेरी यांच्या हवाले करण्यात आलेले असल्याची माहिती पोलिसांनी पुढे दिली. दरम्यान या खून प्रकरणातील संशयित अशोक कुमार याला मंगळवारी वेर्णा पोलीस न्यायालयात उपस्थित करणार अशी माहिती पोलीसांनी दिली. वेर्णा पोलीस स्थानकाचे निरीक्षक संदेश चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास चालू आहे.

आपली मुलगी बिंदु हिचा खून झाल्याचे तिची आई केव्ही मेरी हिला कळताच तिला याबाबत एके प्रकारचा धक्काच बसला. रविवारी रात्री आपण व आपल्या मुलीने एकत्र जेवण केले होते अशी माहिती मेरी हिने पत्रकारांना देऊन असे काय घडणार याची मूळच जाणीव लागली असल्याचे सांगितले. खून झाला आहे याची सुद्धा आपल्याला कल्पना सुद्धा लागली नसून पोलीसांनी घटनास्थळावर पोचून याबाबत आपल्याला कळविल्यानंतर आपल्या मुलीचा जावयाने खून केल्याचे उघड झाल्याचे केव्ही मेरी यांनी सांगितले.

Web Title: Husband's wife murdered by refusing physical relation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.