पोलिसांनी मुसक्या आवळल्या, बंद दुकाने अन् घरफोडी करणारी गँग अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2018 11:21 PM2018-10-02T23:21:08+5:302018-10-02T23:29:46+5:30

पोलिसांनी सापळा लावून सलीम गोहर शेख, मजबूर इस्त्राईल शेख, सैदुल नुरेसलाम शेख, रहमान सजामन शेख या चौघांना पकडले. त्यांच्याकडे घरफोडी करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य आणि नऊ हजाराची रोकड सापडली.

Hanging off the shops and street collapses, the gang stole | पोलिसांनी मुसक्या आवळल्या, बंद दुकाने अन् घरफोडी करणारी गँग अटकेत

पोलिसांनी मुसक्या आवळल्या, बंद दुकाने अन् घरफोडी करणारी गँग अटकेत

मुंबई - दुकाने फोडून त्यातील रोकड आणि इतर मौल्यवान वस्तू पळविणारी एक टोळी पायधुनी पोलिसांच्या हाती लागली असून त्यांनी चौघांना अटक केली आहे. या चौघांवर मुंबईतील विविध पोलिस ठाण्यांमध्ये घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी सापळा लावून सलीम गोहर शेख, मजबूर इस्त्राईल शेख, सैदुल नुरेसलाम शेख, रहमान सजामन शेख या चौघांना पकडले. त्यांच्याकडे घरफोडी करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य आणि नऊ हजाराची रोकड सापडली. अटक करण्यात आलेले चौघेही मस्जिद बंदर, क्रॉफर्ट मार्केट, रे रोड परिसरात राहणारे आहेत. या प्रत्येक आरोपीवर वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात अनेक गुन्हे आहेत.

दक्षिण मुंबईत बंद असलेली दुकाने आणि रस्त्याकडेला असलेली घरे फोडून चोऱ्या करण्याच्या घटना  गेल्या काही दिवसांपासून वाढल्या होत्या. घरफोड्या करणाऱ्यांना पकडण्यासाठी दक्षिण मुंबईतील  सर्व पोलिस ठाण्यांनी रात्रीची गस्त वाढविली होती. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली पायधुनी पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे उपनिरीक्षक लीलाधर पाटील, प्रवीण फडतरे यांच्या पथकाला काहीजण रे रोड परिसरात असल्याची माहिती मिळाली. 

Web Title: Hanging off the shops and street collapses, the gang stole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.