घाटकोपर हिरे व्यापारी हत्या : आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2018 09:02 PM2018-12-18T21:02:09+5:302018-12-18T21:04:24+5:30

सचिन पवारसह दिनेश पवार, सिद्धेश पाटील, महेश भोईर या चौघांना न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. उदानीचे सचिनच्या मैत्रिणीवर असलेल्या वाईट नजरेमुळे ही हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर येत आहे. 

Ghatkopar diamond merchant murder: 14 days judicial custody to the accused | घाटकोपर हिरे व्यापारी हत्या : आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

घाटकोपर हिरे व्यापारी हत्या : आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

ठळक मुद्देचौघांना न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे३ डिसेंबरला पनवेल येथील नेहरे परिसरात एक बेवारस कुजलेला मृतदेह आढळून आला.सचिनने सहआरोपींच्या मदतीने त्याची हत्या केल्याचे तपासात आता स्पष्ट झाले आहे

मुंबई - घाटकोपर येथील हिरे व्यापारी राजेश्वर उदानी यांच्या हत्येप्रकरणी न्यायालयाने आरोपी सचिन पवारसह दिनेश पवार, सिद्धेश पाटील, महेश भोईर या चौघांना न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. उदानीचे सचिनच्या मैत्रिणीवर असलेल्या वाईट नजरेमुळे ही हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर येत आहे. 

पंतनगर परिसरत राहणारे राजेश्वर किशोरलाल उदानी (वय ५७) यांचं घाटकोपर परिसरात सोने विक्रीचं दुकान आहे. उदानी २८ नोव्हेंबर रोजी कामानिमित्त घराबाहेर जात असल्याचं सांगून घराबाहेर पडले. मात्र दुसरा दिवस उजाडला तरी ते घरी आले नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी पंतनगर पोलिसांत ते बेपत्ता असल्याबाबत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर तपासादरम्यान राजेश्वर यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत पनवेल  येथील नेहरे गावाजवळ आढळून आला.राजेश्वर ज्या कारमधून निघाले होते, ती स्विफ्ट डिझायर कार २९ नोव्हेंबरला रात्री ९ वाजता घाटकोपर पूर्वेकडील पूर्व द्रुतगती महामार्गालगत असलेल्या विक्रोळी वाहतूक चौकीसमोर सापडली. त्यानंतर ३ डिसेंबरला पनवेल येथील नेहरे परिसरात एक बेवारस कुजलेला मृतदेह आढळून आला.  

या प्रकरणी पोलिसांनी ३ डिसेंबरला अपहरणाचा गुन्हा दाखल करत पोलिसांनी २५ जणांची चौकशी केली. त्यानंतर राजेश्वर यांच्या मोबाईल रेकॉर्डनुसार गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांचा माजी स्वीय सहाय्यक सचिन पवारसह टप्याटप्याने सात जणांना अटक केली. पुढे न्यायालयाने त्यांना 18 डिसेंबर रोजी पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस तपासात आरोपींनी सचिन यांच्या मैत्रिणीवर उदानी याची वाईट नजर होती. त्याला समजावून देखील तो तिला फोन करून ञास देत होता. त्यावरून सचिनने सहआरोपींच्या मदतीने त्याची हत्या केल्याचे तपासात आता स्पष्ट झाले आहे. हत्येच्या दरम्यान सचिन जरी उपस्थित नसला. तरी फोन वरून तो इतर आरोपींना मार्गदर्शन करत होता. उदानीची हत्या करून दिनेश हा मुरूड येथे महिला आरोपी निखतला घेऊन गेला. या हत्याकांडासाठी सर्वांनीच नवीन सीमकार्ड घेतले होते. विशेष बाब म्हणजे या हत्याकांडानंतर सर्वांनी आपले मोबाइल सिमकार्ड आणि अंगावरील कपडे ही जाळत पुरावे नष्ट केले. मात्र, या सर्वांनी उदानी यांना मारण्यासाठी जी गाडी वापरली. ती गाडी दोन दिवसांपूर्वी आरोपींनी एका मॅकेनिककडे सर्विसिंगसाठी नेण्यात आली होती. त्या ठिकाणी मॅकेनिकच्या न कळत त्यांनी दुसऱ्या गाडीची नंबरप्लेट स्वत:च्या गाडीला लावून स्वत:ची नंबरप्लेट तेथेच सोडून गेल्याने पोलिसांच्या जाळ्यात हे सर्व सहज अडकले. हत्येनंतर मरूडवरून दिनेश व सचिन हे दोघेही दोन दिवस गुवाहटीला गेले होते. ते त्या ठिकाणी का गेले होते याबाबतचा तपास करणे बाकी आहे. तसेच पोलिसांनी तपासाअंती सचिनची खासगी कार ही ताब्यात घेत न्यायालयाकडे तपासासाठी पोलिस कोठडी मागितली होती. मात्र, आरोपींच्या वकिलांनी सर्व गोष्टी पोलिसांना देण्यात आल्या असून देखील वेळ काढूपणा सरकारी वकिल करत असल्याचे आरोपींच्या वकिलांकडून निदर्शनास आणून दिल्यानंतर न्यायालयाने चार ही आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Web Title: Ghatkopar diamond merchant murder: 14 days judicial custody to the accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.