गांजा तस्करांना बेड्या, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, ९० हजार रुपयांचा गांजा जप्त

By चैतन्य जोशी | Published: November 1, 2023 07:45 PM2023-11-01T19:45:43+5:302023-11-01T19:46:03+5:30

दोघांकडून ९० हजार ५४० रुपयांचा गांजाही जप्त केला.

Ganja smugglers handcuffed, action of local crime branch, ganja worth Rs. 90 thousand seized | गांजा तस्करांना बेड्या, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, ९० हजार रुपयांचा गांजा जप्त

गांजा तस्करांना बेड्या, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, ९० हजार रुपयांचा गांजा जप्त

वर्धा : आर्वी हद्दीत अवैधधंद्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिस पथकाने गांजा तस्करी करताना दोघांना रंगेहात अटक केली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आष्टी टी पॉईंट परिसरात ३१ रोजी रात्रीच्या सुमारास केली. दोघांकडून ९० हजार ५४० रुपयांचा गांजाही जप्त केला.

नामदेव गजानन गाखरे (४८ रा. सावळी बु), रामदास भरतराम घागरे (रा. शेलगाव उमाटे) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहे. प्राप्त माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तळेगाव हद्दीत गस्त घालत असताना आष्टी टी पॉईंट परिसरात दोघे गांजा विक्री करताना मिळून आले. पोलिसांनी छापा मारुन दोघांना अटक करीत त्यांच्या ताब्यातून १८ हजार २४० रुपये किंमतीचा ९१२ ग्रॅम वजनाचा गांजा, मोबाईल, दुचाकीसह गांजा विक्रीचे ११ हजार ३०० रुपये असा एकूण ९० हजार ५४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या निर्देशात सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप धोबे, पोलिस उपनिरीक्षक अमोल लगड, मनोज धात्रक, हमिद शेख, श्रीकांत खडसे, संजय बोगा, प्रदीप वाघ, विनोद कापसे, अभिलाष नाईक, अखिल इंगळे, दिनेश बोथकर, विशाल मडावी यांनी केली.

मुख्य सूत्रधारही अटकेत
दोन गांजा तस्करांना अटक केल्यानंतर त्यांनी गांजा मुख्यसूत्रधार सुजित सोनी रा. कारंजा घा. याच्याकडून आणल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिस पथकाने थेट कारंजा गाठून सुजित सोनी यास अटक केली. त्याच्या घराची तपासणी केली असता जवळपास अर्धा ते एक किलो गांजा मिळून आल्याची माहिती आहे. सुजित सोनी हा आरोपींकडून गांजा तस्करीचे रॅकेट चालवित असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्याविरुद्धही गुन्हा दाखल केला.

Web Title: Ganja smugglers handcuffed, action of local crime branch, ganja worth Rs. 90 thousand seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.