वेहेरगावात अज्ञात कारणावरुन युवकावर गोळीबार   

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 09:33 AM2019-07-23T09:33:35+5:302019-07-23T09:33:46+5:30

वेहेरगाव मावळ येथे अज्ञात कारणावरुन एका युवकावर पिस्तुलीने गोळी झाडत प्राणघातक हल्ला करण्यात आला.

Firing on youth for unknown cause in Vehergaon | वेहेरगावात अज्ञात कारणावरुन युवकावर गोळीबार   

वेहेरगावात अज्ञात कारणावरुन युवकावर गोळीबार   

Next

लोणावळा - वेहेरगाव मावळ येथे अज्ञात कारणावरुन एका युवकावर पिस्तुलीने गोळी झाडत प्राणघातक हल्ला करण्यात आला.
मंथन सातकर (रा. कान्हे, मावळ) हा युवक या हल्ल्यात जखमी झाला असून त्याच्या खांद्याला गोळी लागली आहे. कामशेत येथिल शिंदे नामक युवकाने हा गोळीबार केला असल्याची प्राथमिक माहिती पोलीसांच्या हाती मिळाली आहे. वेहेरगाव येथिल तुरे लाॅज याठिकाणी सदरचा हल्ला झाला. घटनेची माहिती समजताच लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक दीपक लुकडे, वडगाव मावळचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर, कामशेतचे पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळाकडे धाव घेत आरोपीचा शोध सुरु केला आहे. दरम्यान पुणे ग्रामीणचे अपर पोलीस अधिक्षक विवेक पाटील व लोणावळा उपविभागाचे प्रभारी पोलीस अधिकारी टोम्पे यांनी घटनास्थळाला भेट देत प्रकरणाचा आढावा घेतला

Web Title: Firing on youth for unknown cause in Vehergaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.