पुण्यात मित्रानेच केला छऱ्याच्या बंदुकीतून मित्रावर गोळीबार 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 12:33 PM2019-03-14T12:33:49+5:302019-03-14T12:38:28+5:30

पूर्वी झालेल्या वादाच्या रागातून एकाने छऱ्याच्या बंदुकीतून मित्रावर गोळीबार केला़

firing on friend in Pune | पुण्यात मित्रानेच केला छऱ्याच्या बंदुकीतून मित्रावर गोळीबार 

पुण्यात मित्रानेच केला छऱ्याच्या बंदुकीतून मित्रावर गोळीबार 

Next

पुणे : पूर्वी झालेल्या वादाच्या रागातून एकाने छऱ्याच्या बंदुकीतून मित्रावर गोळीबार केला़ त्यात मित्र जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत़ ही घटना नांदेड फाटा येथील दळवीनगरमध्ये बुधवारी रात्री साडे दहा वाजता घडली. 
रोनित देवीदास राठोड (वय २५, रा़ दळवीनगर, नांदेडफाटा) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सिंहगड पोलिसांनी भरत वाघ (वय २७, रा़ दळवीनगर, नांदेडफाटा) याला अटक केली असून भय्या प्रसाद शेलार (वय १८) याला ताब्यात घेतले आहे. 
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोनित राठोड आणि भरत वाघ हे दोघे मित्र असून ते जवळजवळ राहतात. त्यांच्या काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. हा राग भरत याच्या मनात होता. बुधवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास भरत रोनित याच्याकडे गेला. त्यावेळी त्याच्या बरोबर भैय्याही होता. त्यावेळी रागाच्या भरात भरत याने आपल्याकडील छऱ्याच्या बंदुकीतून रोनितवर दोन गोळ्या झाडल्या. त्या रोनितच्या पोटात शिरल्या. ही घटना पाहिल्यानंतर रोनित याच्या पत्नीने त्याला तातडीने जवळच्या हॉस्पिटलमध्ये त्याला घेऊन गेल्या व पोलिसांना याची माहिती दिली. सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दुर्योधन पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बंदुक जप्त करुन दोघांनाही ताब्यात घेतले. 

Web Title: firing on friend in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.