लकी ड्रॉ चे आमिष दाखवुन साडेसहा लाखांची फसवणुक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 05:53 PM2018-12-08T17:53:51+5:302018-12-08T17:55:23+5:30

लकी ड्रॉ मध्ये आपली निवड झाली असून मोठी अलिशान मोटार आपणास बक्षिस मिळणार आहे, असे फिर्यादी महिलेस सांगण्यात आले.

Fifth lakhs 50 thousand fraud by lucky draw attract showing | लकी ड्रॉ चे आमिष दाखवुन साडेसहा लाखांची फसवणुक 

लकी ड्रॉ चे आमिष दाखवुन साडेसहा लाखांची फसवणुक 

Next
ठळक मुद्देतीन वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून फिर्यादी महिलेशी संपर्क

पिंपरी : लकी ड्रॉ चे आमिष दाखवुन बँक खाते, डेबीट कार्डची माहिती घेऊन भामट्याने महिलेच्या बँक खात्यातील रक्कम परस्पर दुसऱ्या खात्यात वर्ग केली. यामध्ये एका महिलेला ६ लाख ४० हजाराला गंडा घातला गेला आहे. याबाबत महिलने वाकड पोलीस ठाण्यात फसवणुक झाल्याची फिर्याद दाखल केली आहे. 
 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोना मोतिराम खियानी या महिलेने आरोपींच्या विरोधात वाकड पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. तीन वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून फिर्यादी महिलेशी संपर्क साधण्यात आला. लकी ड्रॉ मध्ये आपली निवड झाली असून मोठी अलिशान मोटार आपणास बक्षिस मिळणार आहे. असे फिर्यादी महिलेस सांगण्यात आले. महिलेकडून डेबीट कार्डचा क्रमांक, ओटीपी अशी माहिती घेतली. ये केले. फसवणुक झाल्याचे लक्षात येताच, महिलेने पोलिसांकडे फिर्याद दिली. 

Web Title: Fifth lakhs 50 thousand fraud by lucky draw attract showing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.