कुटुंबियांना मृत दाखवून इन्शुरन्सचे पैसे लुबाडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 09:22 PM2019-01-28T21:22:21+5:302019-01-28T21:23:20+5:30

इन्शुरन्स कंपनीची तब्बल दीड कोटी रुपयांची फसवणूक झाली असून पोलिसांनी दोन डॉक्टरांसह सहा जणांच्या टोळीला बेड्या ठोकल्या आहेत.

The family exposed the money laundering gang by exposing the insurance company | कुटुंबियांना मृत दाखवून इन्शुरन्सचे पैसे लुबाडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

कुटुंबियांना मृत दाखवून इन्शुरन्सचे पैसे लुबाडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Next

कल्याण - जिवंत व्यक्तींचा मयत दाखल काढून इन्शुरन्सचे पैसे लाटल्याचा खळबळजनक प्रकार ठाणे गुन्हे शाखेच्या कल्याण युनिटने उघडकीस आणला आहे. यातून इन्शुरन्स कंपनीची तब्बल दीड कोटी रुपयांची फसवणूक झाली असून पोलिसांनी दोन डॉक्टरांसह सहा जणांच्या टोळीला बेड्या ठोकल्या आहेत.

विठ्ठलवाडी परिसरात राहणाऱ्या चंद्रशेखर शिंदे याने त्याचा पुतण्या जिवंत असताना त्याचा मयत दाखल काढून ४ लाख ८ हजार रुपये लाटले. त्यानंतर अशाचप्रकारे त्याने त्याची पत्नी, मुलगा, सून, आणि इतर मिळून तब्बल १३ जणांचं मयत दाखल काढला आणि त्याद्वारे त्यांच्या इन्शुरन्सचे ८१ लाख रुपये लाटले. तसेच आणखी ५५ लाख रुपये काढण्याचा त्यांचा प्रयत्न होता.

मात्र, हा प्रकार लक्षात आल्यानं चंद्रशेखरचा पुतण्या व्यंकटेशने गुन्हे शाखेकडे याप्रकरणी माहिती दिली आणि हे प्रकरण उघडकीस आले. या कामात मुंब्र्याचे दोन एमबीबीएस डॉक्टर आणि मुंब्रा स्मशानभूमीत काम करणारा महापालिकेचा कर्मचारी यांचाही सहभाग होता. त्यामुळे पोलिसांनी मुख्य आरोपी चंद्रशेखर याच्यासह स्मशानभूमीचा कर्मचारी तेजपाल मेहरोल, डॉ. इम्रान सिद्दीकी, डॉ. अब्दुल सिद्दीकी, चंद्रशेखरचा मुलगा नारायण आणि सून लक्ष्मी यांना अटक केली आहे. 

Web Title: The family exposed the money laundering gang by exposing the insurance company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.