‘फेन्टानील’चे उत्पादन करणाऱ्या उद्योजकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 05:42 AM2019-07-13T05:42:49+5:302019-07-13T05:43:16+5:30

अमेरिका, युरोपमध्ये घातक ठरलेले ड्रग्ज : गुजरातमध्ये ७ एकरात ५१६ किलोचे उत्पादन

The entrepreneur who produced the Fentanil was arrested | ‘फेन्टानील’चे उत्पादन करणाऱ्या उद्योजकाला अटक

‘फेन्टानील’चे उत्पादन करणाऱ्या उद्योजकाला अटक

googlenewsNext

मुंबई : अमेरिकेत ३३ हजार जणांचा बळी घेणाºया घातक अशा ‘फेन्टानील’चे उत्पादन करणारा गुजरातमधील उद्योजक दीपक नटवरलाल मेहता (५९) याला गुरुवारी अमलीपदार्थविरोधी पथकाने (एएनसी) बेड्या ठोकल्या. एएनसीचे पोलीस उपायुक्त शिवदीप लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून, आतापर्यंत ११६ किलो फेन्टानील जप्त करण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, यापूर्वी एअर कार्गो मार्गे इटलीला ४०० किलो फेन्टालीन गेल्याने सीमा शुल्क विभागाचे अधिकारीही चौकशीच्या घेºयात अडकले आहेत. देशातील ही सर्वांत मोठी कारवाई आहे.


मेहता याच्या राजकोटमधील ६ ते ७ एकरमध्ये असलेल्या कारखान्यात हे अमलीपदार्थ बनविण्यात आले. यात इटलीतील एका नामांकित कंपनीचा वापर करण्यात आल्याचीही माहिती समोर येत आहे. याच कंपनीच्या नावाचा वापर करून इटलीतील तस्कर हा साठा ठिकठिकाणी पोहोचवत असल्याचेही समजते. या कंपनीबाबत अधिक चौकशी सुरू आहे. मेहता हा गुजरातमधील नामांकित उद्योजकांपैकी एक आहे. सुमारे ३०० ते ४०० कोटींच्या संपत्तीचा तो मालक आहे. त्यानुसार, एएनसीचे पथक अधिक तपास करीत आहे.


डिसेंबर २०१८ मध्ये वेलची पूड दाखवून १०० किलो ‘फेन्टानील’ एअरकार्गो मार्गे मॅक्सीकोला नेण्याच्या प्रयत्नात असलेल्या तस्कर सलीम डोला आणि त्याच्या साथीदाराला लांडे यांच्या पथकाने बेड्या ठोकल्या. त्याच्या चौकशीतून, जप्त केलेल फेन्टालीन राजकोटच्या ‘सॅम फाईन ओ केमिकल्स लिमिटेड’ कंपनीत तयार झाल्याची माहिती मिळाली. याच माहितीच्या आधारे, पथकाने तपास सुरू केला. तपासातून पथक मेहतापर्यंत पोहोचले. तेव्हा, मेहताने इटलीतील एका नामांकित कंपनीच्या आॅर्डरनुसार ५१६ किलो फेन्टानीलच्या कच्च्या मिश्रणाचे उत्पादन केल्याची माहिती उघड झाली. त्यापैकी १६ किलोचा साठा कारखान्यातून तर १०० किलोचा साठा एअरकार्गोतून एएनसीने हस्तगत केला. तसेच ४०० किलो फेन्टानील यापूर्वीच एअरकार्गो मार्गे इटलीतील कंपनीला पाठविण्यात आले होते. न्यायवैद्यक प्रयोगशाळेत सलीमकडून आणि कंपनीतून हस्तगत केलेले ‘फेन्टानील’ एकच असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानुसार, अधिक तपास सुरू असल्याची माहिती लांडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. १०० किलो फेन्टानीलच्या मिश्रणापासून आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल ६ हजार ९०० कोटी रुपयांच्या फेन्टानीलच्या गोळ्या तयार होऊ शकतात असेही तपासात स्पष्ट झाले. त्यामुळे एकूण तयार करण्यात आलेल्या फेन्टानीलच्या ३५ ते ४० हजार कोटींच्या गोळ्या तयार होऊ शकतात.


व्हाया मॅक्सीको ते अमेरिका...
फेन्टानीलचे कच्चे मिश्रण तस्कर मॅक्सीकोतून अमेरिकेत पोहोचवत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली.
सीमा शुल्क अधिकारी रडारवर...
च्धक्कादायक बाब म्हणजे ४०० किलो फेन्टानील एअर कार्गोमार्गे इटलीला रवाना झाले आहे. फेन्टानील किंवा त्याचे कच्चे मिश्रण निर्यात करण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी घेणे बंधनकारक आहे.
च्तसे आदेश केंद्र्र सरकारने काढले आहेत. मात्र यात कुठल्याही स्वरूपाची परवानगी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे सीमा शुल्क अधिकाऱ्यांच्या सुरक्षेत एवढ्या मोठ्या प्रमाणात व्यवहार झाल्याने, अधिकारीही संशयाच्या घेºयात सापडले आहेत. त्यांनी याबाबत चौकशी का केली नाही? परवानगी नसताना एवढा मोठा साठा कसा जाऊ दिला? याबाबत एएनसीकडून अधिक तपास सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणात सीमा शुल्क अधिकाºयांवर अटकेची कारवाई होऊ शकते.


भूल, मनोविकारांवरील औषधांमध्ये फेन्टानील
फेन्टानीलचा वापर भूल देण्यासाठी (अ‍ॅनेस्थेशीया), मनोविकारांवरील औषधांमध्ये होतो. कोकेन, हेरॉईन या अमलीपदार्थांपेक्षा फेन्टानीलच्या अवघ्या १ मिलीग्रॅमच्या सेवनातच जास्त नशा चढते. त्यामुळे अमेरिका, युरोपमध्ये याची जास्त मागणी आहे. कोकेनच्या तुलनेत ते स्वस्तही आहे. मात्र परिणाम १०० टक्के घातक आहेत.

Web Title: The entrepreneur who produced the Fentanil was arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.