इस्थर अनुह्या हत्याप्रकरण : सानपला सुनावलेली फाशीची शिक्षा हायकोर्टाने ठेवली कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 05:35 PM2018-12-20T17:35:26+5:302018-12-20T17:37:15+5:30

मुंबई उच्च न्यायालयात या शिक्षेविरोधात अपील दाखल करण्यात आलं होतं. या अपिलावर निकाल देताना उच्च न्यायालयाने सानपला सुनावलेली फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे. 

easther anuhya murder: The High Court has upheld the death sentence awarded to Sanap | इस्थर अनुह्या हत्याप्रकरण : सानपला सुनावलेली फाशीची शिक्षा हायकोर्टाने ठेवली कायम

इस्थर अनुह्या हत्याप्रकरण : सानपला सुनावलेली फाशीची शिक्षा हायकोर्टाने ठेवली कायम

ठळक मुद्देमुख्य आरोपी चंद्रभान सानपला सत्र न्यायालयाने २०१५ साली फाशीची शिक्षा सुनावली होती फाशीची शिक्षा उच्च न्यायालयाच्या न्या. रणजित मोरे आणि न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठाने कायम ठेवली आहे.मुंबई उच्च न्यायालयात या शिक्षेविरोधात अपील दाखल करण्यात आलं होतं.

मुंबई - २४ वर्षीय  इस्थर अनुह्य़ा या सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीचे लोकमान्य टिळक टर्मिनसवरून अपहरण करून तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी मुख्य आरोपी चंद्रभान सानपला सत्र न्यायालयाने २०१५ साली फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात या शिक्षेविरोधात अपील दाखल करण्यात आलं होतं. या अपिलावर निकाल देताना उच्च न्यायालयाने सानपला सुनावलेली फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे. 

5 जानेवारी 2014 च्या पहाटे इस्थर अनुह्य़ा हैदराबादहून ट्रेनने कुर्ला टर्मिनसला आली. मात्र, कुर्ला टर्मिनसवर उतरल्यापासून तिचा काहीच पत्ता लागला नव्हता. 10 दिवसांनी तिचा मृतदेह कांजुरमार्ग ते भांडुपदरम्यान इस्टर्न एक्स्प्रेस वे लगतच्या झुडपामध्ये अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडला होता. यानंतर सीसीटीव्ही फूटेजच्या साहाय्याने मानखुर्द येथील राहत्या घरातून चंद्रभान सानप याला अटक करण्यात आली होती. त्याच्यावर रेल्वेमध्ये चोर्‍या करणे, दरोडे घालण्याचे खटले दाखल आहेत. अखेर सत्र न्यायालयाने सानपला दोषी ठरवलं आणि फाशीची शिक्षा सुनावली होती. या प्रकरणी पोलिसांनी 36 सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचं फूटेज तपासलं आणि त्याआधारेच खुनाचा छडा लावला. स्टेशनवरच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या फूटेजमध्ये इस्थरसोबत एक 35 ते 40 वयातील एक व्यक्ती दिसली होती. या व्यक्तीने इस्थरच्या सामानाची ट्रॉली हातात घेतली होती. हा व्यक्ती आरोपी चंद्रभान सानप होता.

खुनाच्या रात्री इस्थर कुर्ला स्टेशनवर उतरल्यावर सानपनं इस्थरला 300 रुपयांत घरी सोडेन असं सांगितलं. मात्र सानपकडे टॅक्सी नसून मोटारसायकल असल्याचं लक्षात आल्यावर इस्थरनं नकार दिला. त्यावर आपला मोबाईल नंबरही घेऊन ठेवा, असं म्हणत इस्थरला सानपनं राजी केलं. त्यानंतर तिला एका अज्ञात जागी नेऊन तिच्यावर बलात्कार करून, तिची गळा दाबून हत्या केली. सुरुवातीला आपला उद्देश केवळ चोरीचा होता. मात्र नंतर आपलं मन बदललं, अशी कबुली सानपनं दिली होती. मात्र, सत्र न्यायालयाने सुनावलेली फाशीची शिक्षा उच्च न्यायालयाच्या न्या. रणजित मोरे आणि न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठाने कायम ठेवली आहे. आता आरोपीचे वकील या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात पुन्हा अपील दाखल करू शकतात. 



 

Web Title: easther anuhya murder: The High Court has upheld the death sentence awarded to Sanap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.