डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण : सुनावणीची व्हिडीओ रेकॉर्डिंग न करण्याचे कोर्टाचे निर्देश 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2019 09:26 PM2019-06-19T21:26:23+5:302019-06-19T21:27:32+5:30

पायलच्या कुटुंबीयांनी अ‍ॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत मागणी केली होती.

Dr. Payal Tadvi Suicide Case: Court directed not to record video recording of the hearing | डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण : सुनावणीची व्हिडीओ रेकॉर्डिंग न करण्याचे कोर्टाचे निर्देश 

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण : सुनावणीची व्हिडीओ रेकॉर्डिंग न करण्याचे कोर्टाचे निर्देश 

Next
ठळक मुद्दे २१ जूनला आरोपींच्या जामीन अर्जावर नियमित सुनावणी होणार आहे. आरोपींची न्यायालयीन कोठडी संपत असल्याने त्यांना कोर्टात हजर केले जाणार आहे. 

मुंबई - डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी सुनावणीची व्हिडीओ रेकॉर्डिंग होणार नाही असे मुंबई सत्र न्यायालयाचे निर्देश आज दिले आहेत. पायलच्या कुटुंबीयांनी अ‍ॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत मागणी केली होती. २१ जूनला आरोपींच्या जामीन अर्जावर नियमित सुनावणी होणार आहे. आरोपींची न्यायालयीन कोठडी संपत असल्याने त्यांना कोर्टात हजर केले जाणार आहे. 

अलीकडेच डाॅ. पायल तडवीआत्महत्या प्रकरण आता आग्रीपाडा पोलीस ठाण्याकडून गुन्हे शाखेकड़े वर्ग करण्यात आलं. पायल तडवीआत्महत्या प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. २२ मे रोजी ही धक्कादायक घटना घडली तेव्हापासून आग्रीपाडा पोलीस या घटनेचा तपास करत होते. मात्र, या गुन्ह्याची गंभीरता आणि महत्व लक्षात घेता गुन्हे शाखेकडे पायलच्या आत्महत्येचा तपास वर्ग करण्यात आला आहे. डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी अटक केलेल्या डॉ. भक्ती मेहरे, डॉ. हेमा आहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल यांना अटक करण्यात आली असून तिन्ही आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. 


Web Title: Dr. Payal Tadvi Suicide Case: Court directed not to record video recording of the hearing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.