दारूसाठी पैसे न दिल्याने एकास दगडाने मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2019 05:55 PM2019-05-17T17:55:26+5:302019-05-17T17:56:44+5:30

आरोपी रूपेश लक्ष्मण शेळके याला अटक केली आहे.

 Do not pay money for alcohol, beat by stone | दारूसाठी पैसे न दिल्याने एकास दगडाने मारहाण

दारूसाठी पैसे न दिल्याने एकास दगडाने मारहाण

Next
ठळक मुद्देराजू धर्मा वीर (२२) असे या मंडप डेकोरेटर्सचे नाव असून या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला१५ मे रोजी त्याने गावातील एका कार्यक्रमासाठी मंडप टाकला होता. राजू वीर याने पैसे देण्यास नकार दिला.

पनवेल - दारूसाठी पैसे दिले नाहीत, म्हणून तालुक्यातील पाटणोली गावातील मंडप डेकोरेटर्सच्या डोक्यात दगड मारून त्याला जखमी केल्याची घटना घडली आहे. राजू धर्मा वीर (२२) असे या मंडप डेकोरेटर्सचे नाव असून या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी रूपेश लक्ष्मण शेळके याला अटक केली आहे.
तालुक्यातील पाटणोली गावातील ठाकुरवाडीमधील मंडप डेकोरेटर्स राजू धर्मा वीर याचा मंडप डेकोरेटर्सचा व्यवसाय आहे. १५ मे रोजी त्याने गावातील एका कार्यक्रमासाठी मंडप टाकला होता. रात्रीच्या ११ वाजण्याच्या सुमारास आरोपी रूपेश याने वीर यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. राजू वीर याने पैसे देण्यास नकार दिला. त्याचा राग आल्याने रूपेश याने रस्त्यावर पडलेला दगड उचलून राजू वीर याच्या डोक्यात मारला. या हल्ल्यात राजू वीर गंभीर जखमी झाला आहे.

Web Title:  Do not pay money for alcohol, beat by stone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.