सासूला जावई आवडत नव्हता, अंगावर पेट्रोल टाकून दिले पेटवून

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2023 04:03 PM2023-07-11T16:03:12+5:302023-07-11T16:03:27+5:30

या घटनेत गंभीर जखमी झालेल्या जावयावर पाटणा पीएमसीएचमध्ये उपचार सुरू आहेत. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. 

daughter did love marriage mother in law did not like son in law burnt by sprinkling petrol son in law, vaishali, bihar   | सासूला जावई आवडत नव्हता, अंगावर पेट्रोल टाकून दिले पेटवून

सासूला जावई आवडत नव्हता, अंगावर पेट्रोल टाकून दिले पेटवून

googlenewsNext

पाटणा : बिहारमधील वैशाली जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील एक महिलेने आपल्या जावयाला जिवंत जाळून ठार मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत जावई गंभीरपणे भाजला आणि रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. दरम्यान, मुलीच्या प्रेमविवाहामुळे संतापलेल्या महिलेने आपल्या जावयाच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या जावयावर पाटणा पीएमसीएचमध्ये उपचार सुरू आहेत. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. 

पीडित जावयाला त्याच्या पत्नीने फोन करून आपल्या माहेरच्या घरी बोलावले होते. विकास कुमार असे जावयाचे नाव आहे. विकासने गेल्या वर्षी मे महिन्यात पाटेधी पोलीस स्टेशन हद्दीतील कर्णेजी गावातील रहिवासी रामचंद्र राम यांची मुलगी नेहा कुमारी हिच्याशी लग्न केले होते. दोघांनी प्रेमविवाह केला होता. या प्रेमविवाहामुळे विकासचे सासू-सासरे खुश नव्हते. सासूच्या मनात विकासबद्दल राग होता. लग्नाला एक वर्षाहून अधिक काळ लोटला तरी तिने जावई म्हणून विकासला स्वीकारले नव्हते. तरीही नेहा आणि विकासचे आयुष्य सुरळीत चालू होते. 

लग्नानंतर नेहा सासरी राहत होती. दरम्यान, ती आई होणार होती, त्यामुळे ती आपल्या माहेरी राहू लागली. मात्र, विकासला तिला आपल्या घरी घेऊन जायचे होते. परंतू, नेहाची आई तिला सासरी पाठवण्यास तयार नव्हती. आई आणि वडिलांसोबत पत्नी नेहाला भेटायला गेला होता. मात्र नेहाच्या घरच्यांनी त्याला भेटू दिले आणि उलट शिवीगाळ करून माघारी पाठवले, असे पीडित विकासने सांगितले. 

यानंतर विकास घरी परतल्यानंतर नेहाने पुन्हा फोन करून त्याला बोलवून घेतले. यावेळी सासूने विकासच्या अंगावर पेट्रोल व रॉकेल शिंपडून पेटवून दिले. यानंतर विकासला सदर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, तेथे परिस्थिती गंभीर झाल्यानंतर त्याला पीएमसीएच पाटणा येथे पाठवण्यात आले. विकासची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.  

Web Title: daughter did love marriage mother in law did not like son in law burnt by sprinkling petrol son in law, vaishali, bihar  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.