छेडछाडीला कंटाळून गुप्तांग कापलेल्या महिलेसह तिच्या साथीदारांवर खुनाचा गुन्हा 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2018 06:39 PM2018-12-31T18:39:34+5:302018-12-31T18:39:55+5:30

डोंबिवली - सतत छेडछाड काढून शरीरसंबंधासाठी जबरदस्ती करणाऱ्या 27 वर्षीय तरुणाचे गुप्तांग महिलेने तिच्या दोन मित्रांच्या मदतीने कापले होते. त्यानंतर गेल्या चार दिवसांपासून ...

The crime of murder, along with a woman who is being stricken with her wandering, is a crime | छेडछाडीला कंटाळून गुप्तांग कापलेल्या महिलेसह तिच्या साथीदारांवर खुनाचा गुन्हा 

छेडछाडीला कंटाळून गुप्तांग कापलेल्या महिलेसह तिच्या साथीदारांवर खुनाचा गुन्हा 

Next

डोंबिवली - सतत छेडछाड काढून शरीरसंबंधासाठी जबरदस्ती करणाऱ्या 27 वर्षीय तरुणाचे गुप्तांग महिलेने तिच्या दोन मित्रांच्या मदतीने कापले होते. त्यानंतर गेल्या चार दिवसांपासून मृत्यूशी झुंज देणाऱ्या जखमी तरुणाचा अखेर शनिवारी मृत्यू झाला. त्यामुळे या प्रकरणात महिलेसह तिच्या दोघा सहकाऱयांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डोंबिवलीच्या यशवंतनगरमध्ये राहणारा तरुणाचे काही महिन्यांपासून 42 वर्षीय आरोपी महिलेच्या मागावर होता. तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करत असल्याचा आरोप महिलेने केला आहे. संतापलेल्या महिलेने तरुणाला चांगला धडा शिकवण्याचा कट रचला आणि नांदिवली येथील एका मैदानात त्या तरुणाला भेटायला बोलावले. त्यावेळी तेजस म्हात्रे आणि प्रवीण केनिया या तरुणांनी सुभाषला बेदम मारहाण केली. त्यानंतर महिलेने सुभाषचे गुप्तांग कापून  त्याला रुग्णालयात स्वत:च दाखल केले. याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली. रुग्णालयात दाखल केलेल्या सुभाषच्या मेंदूला मार लागल्याने तो बेशुद्धावस्थेतच होता. तसेच गुप्तांग कापल्याने त्याचा रक्तस्रावही थांबत नव्हता. अखेर पुढील उपचारासाठी जे. जे. रुग्णलयात दाखल केलेल्या सुभाषचा मृत्यू झाला. सुभाषला मारहाण करण्यासाठी महिलेला मदत करणारा तेजस हा बेरोजगार असून त्याने इतक्या टोकाच्या गुन्ह्यासाठी महिलेला सहाय्य का केलं याचा पोलीस तपास करत आहेत.

Web Title: The crime of murder, along with a woman who is being stricken with her wandering, is a crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.