भीमा कोरेगाव प्रकरण : पुणे पोलिसांकडून पाच संशयितांविरोधात आरोपपत्र दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 06:13 PM2018-11-15T18:13:26+5:302018-11-15T19:02:57+5:30

माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या पाच संशयितांच्या विरोधात तपास करून पुणे पोलिसांनी गुरुवारी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

The chargesheet filed against five suspects in connection with the Maoists | भीमा कोरेगाव प्रकरण : पुणे पोलिसांकडून पाच संशयितांविरोधात आरोपपत्र दाखल

भीमा कोरेगाव प्रकरण : पुणे पोलिसांकडून पाच संशयितांविरोधात आरोपपत्र दाखल

Next
ठळक मुद्देमुदत संपण्याआधीच या प्रकरणात दोषारोपपत्र सादर

पुणे - माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या पाच संशयितांच्या विरोधात तपास करून पुणेपोलिसांनी गुरुवारी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या सुधीर ढवळे, सुरेंद्र गडलिंग, शोमा सेन, महेश राऊत, रोना विल्सन यांच्या अटकेला ३ सप्टेंबर रोजी ९० दिवस पुर्ण झाल्यानंतर आरोपपत्र दाखल करण्यासाठी पुन्हा ९० दिवसांच्या मुदतवाढीसाठी अर्ज करण्यात आला होता. ९० दिवसांत त्यांच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल न झाल्यास आरोपींना जामीन मिळू शकतो. परंतु, पोलिसांनी वाढवून मिळालेली मुदत संपण्याआधीच गुरुवारी संशयितांविरोधात आरोपपत्र दाखल केले. ही मुदत संपण्याआधीच या प्रकरणातील तपास अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दोषारोपपत्र सादर केले आहे. दरम्यान या गुन्ह्याचा तपास करण्याचा अधिकार पुणे पोलिसांना नसून तो एनआयएकडे सोपविण्यात यावा, अशी मागणी जनहित याचिकेद्वारे उच्च न्यायालयात करण्यात आली होती. अधिकार नसताना तपास केला म्हणून संबंधित तपास अधिका-यावर कारवाई करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली होती, त्यावर डॉ, पवार यांनी सांगितले होते की, चुकीच्या व्यक्तीने तपास केला असेल ते त्यावर कायद्यानुसार कारवाई करावी.

Web Title: The chargesheet filed against five suspects in connection with the Maoists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.