कन्हैय्या कुमारच्या विरोधातील आरोपपत्र कोर्टाने लावले फेटाळून  

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2019 06:16 PM2019-01-19T18:16:29+5:302019-01-19T18:18:45+5:30

आरोपपत्र दाखल करण्यापूर्वी दिल्ली सरकारची परवानगी का घेतली नाही, असा सवाल कोर्टाने पोलिसांना केला. राज्याच्या कायदा विभागाकडून परवानगी न घेता तुम्ही आरोपपत्र दाखल कसे काय केले? अशी विचारणा शहर दंडाधिकारी दीपक राजावत यांनी केली. 

The charges against Kanhaiya Kumar are rejected by the court | कन्हैय्या कुमारच्या विरोधातील आरोपपत्र कोर्टाने लावले फेटाळून  

कन्हैय्या कुमारच्या विरोधातील आरोपपत्र कोर्टाने लावले फेटाळून  

googlenewsNext
ठळक मुद्दे कोर्टाने दिल्ली पोलिसांची चांगलीच कानउघाडणी देखील केली. आरोपपत्र दाखल करण्यापूर्वी दिल्ली सरकारची परवानगी का घेतली नाही, असा सवाल कोर्टाने पोलिसांना केला.

नवी दिल्ली - जेएनयूचा माजी विद्यार्थी नेता कन्हैय्या कुमार याच्याविरोधातदिल्ली पोलिसांनी  पतियाळा हाऊस कोर्टात दाखल केलेले  आरोपपत्र कोर्टाने फेटाळून लावले आहे. याप्रकरणी कोर्टाने दिल्ली पोलिसांची चांगलीच कानउघाडणी देखील केली. आरोपपत्र दाखल करण्यापूर्वी दिल्ली सरकारची परवानगी का घेतली नाही, असा सवाल कोर्टाने पोलिसांना केला. राज्याच्या कायदा विभागाकडून परवानगी न घेता तुम्ही आरोपपत्र दाखल कसे काय केले? अशी विचारणा शहर दंडाधिकारी दीपक राजावत यांनी केली. 

दिल्ली पोलिसांनी कन्हैयासह उमर खालिद, अनिर्बान भट्टाचार्य, आकिब हुसैन, मुजीब हुसैन, मुनीब हुसैन, उमर गुल, रईस रसूल, बशरत अली आणि खालिद बशीर भट यांच्या विरोधात १२०० पानांचे आरोपपत्र ट्रंकभर पुराव्यांसह दाखल केले होते. संसद हल्लाप्रकरणी फाशीची शिक्षा देण्यात आलेला दहशतवादी अफझल गुरू याच्या समर्थनार्थ ९ फेब्रुवारी २०१६ रोजी जेएनयूत एका कार्यक्रमाचे आयोजन करून देशद्रोही स्वरूपाच्या घोषणा देण्यात आल्याचा आरोप पोलिसांनी केला होता.   

ट्रंकभर पुराव्यांसह कन्हैय्या आणि १० जणांविरोधात १२०० पानांचे आरोपपत्र; उद्यापासून सुनावणी 

Web Title: The charges against Kanhaiya Kumar are rejected by the court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.