न्यायालयाच्या आदेशाने भिवंडीतील भूमी वर्ल्डच्या मालकावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 05:50 PM2021-08-03T17:50:30+5:302021-08-03T17:50:56+5:30

अनधिकृत बांधकामासह शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक आदी प्रकरणांमध्ये सतत चर्चेत असलेल्या भिवंडीतील भूमी वर्ल्ड गोदाम संकुलनाचे मालक व बांधकाम व्यावसायिक प्रकाश नानाजी पटेल यांच्यावर गुन्हा दाखल

A case has been registered against the owner of Bhumi World in Bhiwandi | न्यायालयाच्या आदेशाने भिवंडीतील भूमी वर्ल्डच्या मालकावर गुन्हा दाखल

न्यायालयाच्या आदेशाने भिवंडीतील भूमी वर्ल्डच्या मालकावर गुन्हा दाखल

googlenewsNext

नितिन पंडीत 

भिवंडी ( दि ३ ) अनधिकृत बांधकामासह शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक आदी प्रकरणांमध्ये सतत चर्चेत असलेल्या भिवंडीतील भूमी वर्ल्ड गोदाम संकुलनाचे मालक व बांधकाम व्यावसायिक प्रकाश नानाजी पटेल यांच्यासह त्यांचे भाऊ व व्यवस्थापकावर दलित समाजातील युवकाला शिवीगाळ व अंगावर धावून गेल्याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे . विशेष म्हणजे पोलिसांकडून न्याय न मिळाल्याने घटनेच्या तब्बल पाच महिन्यांनंतर ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाच्या आदेशा नंतर कोनगाव पोलिसांनी भूमी वर्ल्डच्या मालकांवर गुन्हा दाखल केला आहे.

प्रकाश नानजी पटेल , संदीप नानजी पटेल व रंजित बाबरे असे गुन्हा दाखल झालेल्या बांधकाम व्यावसायिक व व्यवस्थापकाची नवे असून प्रकाश पटेल व संदीप पटेल हे भिवंडीतील पिंपळास येथे असलेल्या भूमी वर्ल्ड गोदाम संकुलाचे मालक असून रंजित बाबरे हा त्यांचा व्यवस्थापक आहे. २३ जानेवारी रोजी आरपीआय आठवले गटाचे भिवंडी तालुकाध्यक्ष अभय बंडू जाधव हे आपला मित्र जितेंद्र जगन्नाथ जाधव याच्या सोबत पाईप लाईनने माणकोली येथे जात असतांना भूमी वर्ल्ड जवळ थांबेल असता फोनवर बोलत असतांना सुरक्षारक्षकाने अभय यांनी बांधकामाचे फोटो काढल्याचा संशय आल्याने तशी माहिती भूमिवर्ल्ड व्यवस्थापनास दिली त्यांनतर याठिकाणी भूमिवर्ल्ड गोदाम संकुलनाचा व्यवस्थापक रंजित बाबरे, भूमिवर्ल्डचे मालक प्रकाश पटेल व संदीप पटेल यांच्यासह इतर आठ ते दहा जण आले व त्यांनी अभय यांच्या अंगावर धावत जाऊन जातीवाचक शिवीगाळ केली. त्यामुळे अभय जाधव यांच्या सामाजिक व धार्मिक भावना दुखावल्या होत्या . 

याप्रकरणी अभय जाधव यांनी कोनगाव पोलीस ठाण्यात भूमिवर्ल्डच्या मालक व व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार केली होती मात्र कोनगाव पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष करत उलट अभय जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांवर त्यावेळी गंभीर गुन्हा दाखल केला होता . कोनगाव पोलिसांकडून न्याय न मिळाल्याने अखेर अभय जाधव यांनी ठाणे जिल्हा स्तर न्यायालयात धाव घेतली होती अखेर जिल्हा सत्र न्यायालयाने सीआरपीसी कलम १५६ ( ३) नुसार कोनगाव पोलिसांना तपास करण्याचे आदेश दिल्यानंतर घटनेच्या पाच महिन्यांनंतर १३ जुलै रोजी कोनगाव पोलिसांनी भूमिवर्ल्ड चे मालक व व्यवस्थापक अशा तीन जणांवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे .

दरम्यान न्यायालयाच्या आदेशाने भूमी वर्ल्ड गोदाम संकुलच्या मालकावर गुन्हा दाखल केला असून अजून कुणालाही अटक करण्यात आली नाही अशी प्रतिक्रिया या प्रकरणाचे तपास अधिकारी तथा भिवंडी पश्चिमचे सहा. पोलीस आयुक्त किसन गावित यांनी दिली आहे. तर गुन्हा दाखल होऊन २० दिवस उलटूनही कोनगाव पोलिसांनी आरोपींना अटक केलेली नसल्याने फिर्यादी अभय जाधव यांनी पोलिस प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे .        

 

Web Title: A case has been registered against the owner of Bhumi World in Bhiwandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.