जेव्हा बसचालक चालती बस सोडून नाचु-गाऊ लागतो

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2017 02:49 PM2017-10-30T14:49:54+5:302017-10-30T15:28:03+5:30

प्रवाश्यांनी भरलेल्या धावत्या बसचा ड्रायव्हर स्टेअरिंग सोडून अचानक गाणी लावून नाचू लागला तर प्रवाश्यांचं काय होतं?

bus driver started singing and dancing in running bus | जेव्हा बसचालक चालती बस सोडून नाचु-गाऊ लागतो

जेव्हा बसचालक चालती बस सोडून नाचु-गाऊ लागतो

Next
ठळक मुद्देही घटना कोलंबियातील एका लोकल बसमध्ये घडली. बसचा ड्र्रायव्हर अचानक स्टेअरिंग सोडून नाचू लागला.प्रवाशांनी भरलेली ही बस त्याच वेगात धावत असताना तो ड्रायव्हर मात्र गाणी गात नाचतच होता.

कोलंबिया : चालत्या बसमधून जर ड्रायव्हर अचानकपणे नाचू-गाऊ लागला तर, तुम्हाला नवल वाटेल ना. येथील एका लोकल बसच्या ड्रायव्हरने असा कारनामा केला आहे. बस रस्त्यावर धावत असताना त्याने चक्क आपलं नाच-गाणं सुरु केलं. एका प्रवाश्याने या ड्रायव्हरचा हा कारनामा मोबाईल कॅमेऱ्यात कैद  केला असून तो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

कोलंबियामधील एका लोकल बसमध्ये जवळपास २५ ते ३० प्रवासी होते. एका हायवेला ही बस सुसाट वेगाने धावत  होती. त्यामुळे असं काही घडेल हे कोणालाच माहित नव्हतं. मात्र अचानक त्या बसचा ड्रायव्हर उठला आणि गाणी गात नाचू लागला. सगळ्या प्रवाशांना नवल आणि भीती वाटू लागली. बस तरीही त्याच स्पीडने धावत होती. तो नाचता नाचता मध्येच गाडीचं स्टेअरिंग योग्यरित्या हँडल करत होता. तेथील एका प्रवाशाने हा सगळा प्रकार शूट केला आणि सोशल मीडियावर टाकला आहे.

पण गंमत अशी की  ड्रायव्हरने हा सगळा थरार एका टोविंग ट्रकच्या सहाय्याने केला आहे. या व्हिडिओत शेवटी कबूल करण्यात आलंय की, या बसला एका टोविंग ट्रकला बांधण्यात आलं होतं. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नव्हती. म्हणूनच ड्रायव्हरने बसलाच डान्स फ्लोअर बनवला. मात्र व्हिडिओ संपल्यानंतर सत्य समोर आल्यावर सर्व नेटकऱ्यांचा जीव भांड्यात पडला.

सौजन्य - www.dailymail.co.uk

Web Title: bus driver started singing and dancing in running bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.