लाचखोर वनरक्षकाला एसीबीने केली रंगेहाथ अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2019 05:50 PM2019-01-16T17:50:35+5:302019-01-16T17:51:56+5:30

१० हजारांची स्वीकारली लाच; रेती वाहतुकीसाठी १५ हजारांची मागणी

The bribe conservator of the deceased has been arrested by the ACB | लाचखोर वनरक्षकाला एसीबीने केली रंगेहाथ अटक 

लाचखोर वनरक्षकाला एसीबीने केली रंगेहाथ अटक 

Next
ठळक मुद्देअतुल प्रभाकर धात्रक (३४) असे त्या वनरक्षकाचे नाव असून तो देलोडा बिटमधील मरेगाव उपक्षेत्रात कार्यरत आहे. तक्रारीवरून एसीबीच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी आरमोरी येथील जुन्या बसस्थानक परिसरात सापळा रचला. दरम्यान १५ हजारांऐवजी तडजोडीअंती १० हजार रुपये देण्याचे ठरले.

आरमोरी (गडचिरोली) - रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई न करणे तसेच यापुढेही संबंधित रेती वाहतूकदारास अभय देण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच मागून तडजोडीअंती १० हजार रुपये स्वीकारणाऱ्या वनरक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मंगळवारी सायंकाळी रंगेहाथ अटक केली. 
अतुल प्रभाकर धात्रक (३४) असे त्या वनरक्षकाचे नाव असून तो देलोडा बिटमधील मरेगाव उपक्षेत्रात कार्यरत आहे. वनक्षेत्रातून जाणाऱ्या रेती वाहतुकीवरील ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी वनरक्षक धात्रक याने १५ हजार रुपये मागितले होते. संबंधित वाहतुकदाराने याबाबतची तक्रार एसीबीकडे केली. तक्रारीवरून एसीबीच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी आरमोरी येथील जुन्या बसस्थानक परिसरात सापळा रचला. दरम्यान १५ हजारांऐवजी तडजोडीअंती १० हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार धात्रक याला पैसे घेताना पकडण्यात आले. विशेष म्हणजे धात्रक याने १५ दिवसांपूर्वी रेतीची वाहतूक करणारे काही ट्रॅक्टर पकडले होते. 
आरोपी धात्रक याच्याविरोधात आरमोरी पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाई गडचिरोली एसीबीचे पोलीस निरीक्षक रवी राजुलवार, सहायक फौजदार मोरेश्वर लाकडे, पोलीस हवालदार प्रमोद ढोरे, नत्थू धोटे, नाईक पोलीस शिपाई सतीश कत्तीवार, सुधाकर दंडिकेवार, देवेंद्र लोनबले, पोलीस शिपाई महेश कुकुडकार, गणेश वासेकर, किशोर ठाकूर, सुभाष सालोटकर, सोनी तावाडे, सोनल आत्राम, तुळशिराम नवघरे, घनश्याम वडेट्टीवार आदींनी केली.

Web Title: The bribe conservator of the deceased has been arrested by the ACB

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.