हिरानंदानी बिल्डरकडे खंडणी मागितल्याप्रकरणी भाजपाच्या सुधीर बर्गे यांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 01:47 PM2018-10-27T13:47:53+5:302018-10-27T13:49:46+5:30

भाजपाच्या सुधीर बर्गे यांच्यासह तिघांना शनिवारी खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

BJP leader Sudhir Barge arrested for the demand for a ransom from Hiranandani Builder | हिरानंदानी बिल्डरकडे खंडणी मागितल्याप्रकरणी भाजपाच्या सुधीर बर्गे यांना अटक

हिरानंदानी बिल्डरकडे खंडणी मागितल्याप्रकरणी भाजपाच्या सुधीर बर्गे यांना अटक

googlenewsNext

ठाणे :  भाजपाच्या सुधीर बर्गे यांच्यासह तिघांना शनिवारी खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

ठाण्यातील प्रसिद्ध हिरानंदानी बिल्डरकडे खंडणी मागितल्याप्रकरणी सुधीर बर्गे यांच्यासोबतच माहिती अधिकार कार्यकर्ते शौकत मुलानी आणि आरिफ इराकी यांना अटक करण्यात आली आहे. माहिती अधिकार आणि जनहित याचिकेच्या माध्यमातून या तिघांकडून खंडणी उकळली जात होती, असे सांगण्यात येत आहे.

आरटीआय कार्यकर्त्यांचे खंडणी उकळणारे रॅकेट ठाणे आणि मुंबईत कार्यरत असल्याची तक्रार सहा महिन्यांपूर्वी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर सुधीर बर्गे, शौकत मुलानी आणि आरिफ इराकी यांची नावे समोर आली. 

सुधीर बर्गे हे ठाणे महापालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक होते. सध्या ते भाजपामध्ये आहेत. 2007 साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर नगरसेवक म्हणून सुधीर बर्गे निवडून आले होते. तर मागील महापालिका निवडणुकीत त्यांच्या पत्नीने भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती.

Web Title: BJP leader Sudhir Barge arrested for the demand for a ransom from Hiranandani Builder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.