बंगळुरूमध्ये भर वर्गात 20 विद्यार्थ्यांसमोर मुख्याध्यापकाची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 11:17 AM2018-10-15T11:17:35+5:302018-10-15T11:20:03+5:30

कर्नाटकची राजधानी बंगळुरुमधील एका शाळेत मुख्याध्यापकाची भर वर्गात 20 विद्यार्थ्यांसमोर हत्या केल्याची घटना समोर आली आहे. शाळेत मुख्याध्यापक विद्यार्थ्यांना शिकवत असताना सहा मारेकऱ्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला.

Bengaluru School Principal Hacked To Death In Front Of 20 Students | बंगळुरूमध्ये भर वर्गात 20 विद्यार्थ्यांसमोर मुख्याध्यापकाची हत्या

बंगळुरूमध्ये भर वर्गात 20 विद्यार्थ्यांसमोर मुख्याध्यापकाची हत्या

Next

बंगळुरू : कर्नाटकची राजधानी बंगळुरुमधील एका शाळेत मुख्याध्यापकाची भर वर्गात 20 विद्यार्थ्यांसमोर हत्या केल्याची घटना समोर आली आहे. शाळेत मुख्याध्यापक विद्यार्थ्यांना शिकवत असताना सहा मारेकऱ्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. या घटनेत मुख्याध्यापकाचा मृत्यू झाला असून याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. 

स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अग्रहारा दसरहल्ली उपनगरमधील हवानुर येथील एका शाळेत मुख्याध्यापक रंगनाथ नायक हे दहावीच्या विद्यार्थ्यांना शिकवत होते. त्यावेळी सहा मारेकरी शाळेच्या वर्गात घुसले आणि त्यांनी धारधार हत्याराने वार केले. त्यानंतर मारेकऱ्यांनी एका कारमधून पळ काढला. 

दरम्यान, या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि यामधील एका मारेकऱ्याला महालक्ष्मी परिसरातून ताब्यात घेतले आहे. यावेळी आरोपीने पोलिसांवर हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, रंगनाथ यांची हत्या जमिनीच्या वादातून झाली असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली असून याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे. 

Web Title: Bengaluru School Principal Hacked To Death In Front Of 20 Students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.