आई होण्यासाठी तिनं केलं ९ महिन्याच्या मुलीचं अपहरण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2018 09:38 PM2018-11-23T21:38:27+5:302018-11-23T21:40:06+5:30

पोलिसांनी तपासचक्रे फिरवून २४ तासांच्या आत अपहृत चिमुकलीची सुटका करून आरोपी महिलेला अटक केली.

To become mother, that lady had kidnapped 9 month girl child | आई होण्यासाठी तिनं केलं ९ महिन्याच्या मुलीचं अपहरण

आई होण्यासाठी तिनं केलं ९ महिन्याच्या मुलीचं अपहरण

googlenewsNext
ठळक मुद्देचारवेळा गर्भपात झालेल्या आरोपी महिलेने आई होण्याच्या आशेपोटी दुसऱ्या महिलेचे ९ महिन्याचे बाळाचे अपहरण केलेया परिसरातील नबिदा (वय ४०) या  महिलेने नसरीन यांना अंदर नियास बाट रहे है। आप नियास लेके आओ मै आपके बेटी को संभालती हू असे सांगितले. पोलिसांनी मोठया शिताफीने २५ वर्षीय महिलेला अटक करून चिमुकलीची सुटका केली

मुंबई - मानखुर्दमध्ये राहणारी महिला दोन मुलांसह ईद ए मिलादसाठी भेंडी बाजार येथे आली असता तिच्या ९ महिन्याच्या चिमुकलीचे अपहरण एका महिलेने केले. या घटनेची तक्रार जे.जे. मार्ग पोलीस ठाण्यात दाखल होताच पोलिसांनी तपासचक्रे फिरवून २४ तासांच्या आत अपहृत चिमुकलीची सुटका करून आरोपी महिलेला अटक केली. चारवेळा गर्भपात झालेल्या आरोपी महिलेने आई होण्याच्या आशेपोटी दुसऱ्या महिलेचे ९ महिन्याचे बाळाचे अपहरण केले. 
बुधवारी मोहम्मद पैगंबरांची जयंती मोठया उत्स्फूर्तपणे साजरी करीत होते. मानखुर्द , मंडाला कांडा चाळ येथे राहणारी नसरीन हबीबुल्ला खान (वय २६) ही महिला जयंती सोहळा साजरा करण्यासाठी भेंडी बाजार येथील नातेवाईकांकडे ९ महिन्यांची मुलगी गुल्बसा व पाच वर्षीय आक्सा यांच्यासह आली होती. या वेळी या परिसरातील नबिदा (वय ४०) या  महिलेने नसरीन यांना अंदर नियास बाट रहे है। आप नियास लेके आओ मै आपके बेटी को संभालती हू असे सांगितले.  त्या महिलेवर विश्वास ठेवून नसरीन नियास घेण्यासाठी गेली. दरम्यान अनोळख्या पाहिलेले नसरीन यांच्या  गुल्बसा या लहान मुलीला घेऊन पळून गेली. मुलीचे अपहरण झाल्याचे पाहून नसरीन गर्भगळीत झाली. घाबरलेल्या अवस्थेत नसरीन यांनी जे. जे. मार्ग पोलीस ठाण्यात धाव घेत याप्रकरणी तक्रार दाखल केली. पोलिसांनी या संवेदनशील प्रकरणाची तात्काळ दखल घेत तपासला सुरुवात केली. भेंडी बाजार परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच जवळच्या रेल्वेस्टेशनमधील आणि खाजगी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. नंतर अपहरण करणाऱ्या महिलेची ओळख पटवली. स्थानिक खबऱ्यांच्या मदतीने आरोपी महिला घोगारी मोहल्ला येथे असल्याची माहिती मिळाली. मात्र या परिसरात ईद ए मिलादमुळे मोठी गर्दी होती. गर्दी नियंत्रणात आणून पोलिसांनी मोठया शिताफीने २५ वर्षीय महिलेला अटक करून चिमुकलीची सुटका केली. या संवेदनशील व गुंतागुंतीच्या प्रकरणाचा तात्काळ छडा जे. जे. पोलिसांनी २४ तासांत लावला आणि ९ महिन्याच्या चिमुकलीला आईकडे स्वाधीन केले. आरोपी महिला नबिदा सध्या पोलीस कोठडीत आहे. 

Web Title: To become mother, that lady had kidnapped 9 month girl child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.