पोलीस पथकावर हल्ला, तीन आरोपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 10:42 PM2018-08-17T22:42:01+5:302018-08-17T22:42:10+5:30

सोनसाखळी चोरीच्या गुन्हयातील आरोपीला अटक करण्यासाठी गेलेल्या उल्हासनगर क्राईम ब्रँचच्या पथकाच्या वाहनावर जमावाच्या वतीने दगडफेक करण्यात आल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास घडली.

The attack on the police squad, the arrest of three accused | पोलीस पथकावर हल्ला, तीन आरोपींना अटक

पोलीस पथकावर हल्ला, तीन आरोपींना अटक

Next

कल्याणः  सोनसाखळी चोरीच्या गुन्हयातील आरोपीला अटक करण्यासाठी गेलेल्या उल्हासनगर क्राईम ब्रँचच्या पथकाच्या वाहनावर जमावाच्या वतीने दगडफेक करण्यात आल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास घडली. यात तीन पोलीस किरकोळ जखमी झाले असून तीन आरोपींना कल्याण च्या  खडकपाडा पोलिसांनी अटक केली आहे. आंबिवली येथील इराणी वस्तीत ही घटना घडली. यापुर्वीही या ठिकाणी पोलिसांवर हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत. शुक्रवारी सायंकाळी उल्हासनगर क्राइम चे पथक सोनसाखळी चोरीच्या गुन्हयातील सराईत चोराला पकडण्यासाठी इराणी वस्तीत आले होते. यावेळी पोलिसांच्या जीपवर तेथे जमलेल्या जमावाने दगडफेक केली. यात सालगुडे, पाटील हे सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि हवालदार  गणेश पाटील असे तीघे जखमी झाले. त्यांना उपचारार्थ उल्हासनगर मधील मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या घटनेप्रकरणी कल्याणच्या खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सध्या सुरु असून तीन आरोपींना कल्याण च्या पोलिसांनी कोंबींग आँपरेशन करुन अटक केली आहे. त्यांची नावे मात्र समजू शकलेली नाहीत.

Web Title: The attack on the police squad, the arrest of three accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Arrestअटक